बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा होत आहे. बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करणारे सोनाक्षी व झहीर आता लग्न करून नातं अधिकृत करणार असल्याचं म्हटलं जात आहे. हे जोडपं २३ जूनला मुंबईत लग्न करणार, असं कळतंय. अशातच आता त्यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका लिक झाली आहे. रेडिटवर ही पत्रिका व्हायरल होत आहे, त्यानुसार हे जोडपे २३ जून रोजी लग्न करणार आहे. व्हायरल होत असलेली पत्रिका खूपच अनोखी आहे. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाच्या पत्रिकेत एक ऑडिओ क्यूआर कोड देण्यात आला आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर सोनाक्षी आणि झहीरचा इन्व्हिटेशन मेसेज ऐकू येतो.

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आजकालची मुलं आई-वडिलांची…”

या ऑडिओ मेसेजच्या सुरुवातीला हे दोघे म्हणतात, “आमच्या सर्व, टेक सॅव्ही व गुप्तहेर मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांना हाय!” झहीर पुढे म्हणतो, “गेल्या सात वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. आनंद, प्रेम, एकमेकांसोबत हसणं या सगळ्या गोष्टींना आम्हाला या क्षणापर्यंत आणलं आहे.”

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांची संपत्ती किती? दोघांपैकी श्रीमंत कोण? जाणून घ्या

सोनाक्षी पुढे म्हणते, “तो क्षण जेव्हा आम्ही एकमेकांच्या कथित गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या पलीकडे जाऊन पुढचं पाऊल उचलतोय.” झहीर म्हणतो, “एकमेकांचे अधिकृत पती-पत्नी बनण्यासाठी.” यानंतर दोघे एकत्र म्हणतात, “तर तुमच्याशिवाय हे सेलिब्रेशन पूर्ण होणार नाही, म्हणून २३ जूनला तुम्ही जे काही करत आहात ते सोडून आमच्याबरोबर पार्टी करा.”

हेही वाचा – झहीर इक्बालशी लग्नाच्या चर्चा, सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “मला माझ्या आई-वडिलांपेक्षा…”

Sonakshi Sinha Zaheer Iqbal wedding Invitation
सोशल मीडियावर व्हायरल होणारी सोनाक्षी व झहीरच्या लग्नाची पत्रिका (क्रेडिट – रेडिट)

‘अफवा खऱ्या आहेत’ असं या व्हायरल पत्रिकेवर लिहिलेलं दिसतंय. सोनाक्षी व झहीर यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका खास पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहे. सर्व पाहुण्यांना फेस्टिव्ह व फॉर्मल ड्रेस कोडमध्ये लग्नात येण्यास सांगितलं आहे. या दोघांच्या लग्नाचा सोहळा मुंबईतील बास्टियन इथे रात्री ८ वाजतापासून सुरू होईल.

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बाल पारंपरिक पद्धतीने लग्न करणार की निकाह? जवळच्या मैत्रिणीने दिली मोठी माहिती

दरम्यान, सोनाक्षी व जहीरने त्यांच्या सोशल मीडियावर अद्याप याबद्दल काहीच शेअर केलेलं नाही. तर सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा व तिचा भाऊ लव्ह सिन्हा यांनी आपल्याला लग्नाबद्दल काहीच माहीत नसल्याचं सांगितलं. “आजकालची मुलं आई-वडिलांना विचारत नाहीत, तर आपला निर्णय कळवतात. सोनाक्षी सज्ञान आहे त्यामुळे ती चुकीचा निर्णय घेणार नाही. जेव्हा ती तिच्या निर्णयाबद्दल आम्हाला कळवेल तेव्हा आम्ही तिला आशीर्वाद देऊ, मला तिच्या वरातीसमोर नाचायला आवडेल,” असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते.

Story img Loader