Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Reception: बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच लग्नबंधनात अडकली. २३ जून २०२४ रोजी सोनाक्षीनं झहीर इक्बालशी नोंदणी पद्धतीनं लग्न केलं. सोनाक्षीच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अभिनेत्रीच्या अगदी साध्या पद्धतीनं लग्न करण्याच्या निर्णयाला चाहत्यांनी पसंती दिली. सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायत.
सोनाक्षीनं लग्नासाठी ऑफ व्हाईट रंगाची चिकनकारी साडी नेसली होती. केसात गजरा, गोल्डन ज्वेलरी व मिनिमल मेकअप यांत नववधूचं सौंदर्य अगदी खुलून दिसत होतं. सोनाक्षीनं या खास दिवशी तिच्या आईची म्हणजेच पूनम यांची साडी नेसली होती. झहीरनं सोनाक्षीला मॅचिंग करीत डिझायनर कुर्ता परिधान केला होता.
हेही वाचा… ‘पारू’ फेम शरयू आणि संजना थिरकल्या ‘नटरंग’ चित्रपटातील गाण्यावर, व्हिडीओ व्हायरल
सोनाक्षी-झहीरच्या रिसेप्शनला बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खान, रविना टंडन, अनिल कपूर, विद्या बालन, रिचा चड्ढा, काजोल अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
आता काजोलनं तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करीत या नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. काजोलनं शेअर केलेला व्हिडीओ सुरू होताच त्यात काजोल सोनाक्षीबरोबर डान्स करताना दिसतेय आणि झहीरलाही व्हिडीओमध्ये येण्यासाठी आग्रह करते. काजोलने हा व्हिडीओ शेअर करीत ‘सोनाक्षी आणि झहीर तुम्हाला खूप साऱ्या टनभर शुभेच्छा’, अशी कॅप्शन दिली. काजोलनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
काजोलनं रिसेप्शनसाठी मेटॅलिक गोल्ड अॅण्ड ब्लॅक रंगाची डिझायनर साडी परिधान केली होती; तर सोनाक्षीनं रिसेप्शन लूकसाठी लाल रंगाची पारंपरिक साडी नेसली होती. सोनेरी रंगाचं वर्क या साडीवर होतं. सोनाक्षीनं रिसेप्शनाच्या हेअरस्टाईलसाठीही स्लीक बन आणि गजऱ्याची निवड केली होती. हिरव्या रंगाचा कॉन्ट्रास्ट नेकलेस, लाल चुडा, मिनिमल मेकअप यांची सोनाक्षीनं रिसेप्शन लूकसाठी निवड केली होती.
हेही वाचा… ‘ठरलं तर मग’ फेम प्रियांका तेंडोलकरला आवडतो ‘हा’ अभिनेता, म्हणाली, “तो पळून…”
दरम्यान, सोनाक्षी आणि जहीरच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगायचं झालं तर, २३ जून २०१७ पासून दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. सात वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी मुंबईमध्ये नोंदणी पद्धतीनं लग्न केलं; तर मुंबईतील बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.