Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding Reception : सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल आता पती-पत्नी झाले आहेत. त्यांनी मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यांच्या लग्नाला दोघांचेही कुटुंबीय आणि इंडस्ट्रीतील काही मित्र उपस्थित होते. घरी नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर त्यांनी रिसेप्शन पार्टी दिली. या पार्टीला बॉलीवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली.

सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल त्यांच्या रिसेप्शनमध्ये खूपच सुंदर दिसत होते. सोनाक्षीने रिसेप्शनसाठी लाल रंगाची साडी नेसली होती, तर एक नेकलेस व कानातले घालून तिने तिचा लूक पूर्ण केला. केसात गजरा, भांगेत कुंकू आणि साध्या मेकअपमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत होती. तर झहीरने पांढरी शेरवानी घातली होती.

लग्नानंतर झहीर इक्बालने घेतले सासू-सासऱ्यांचे आशीर्वाद, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ते एकमेकांच्या संस्कृतीचा…”

सोनाक्षी सिन्हा व झहीर यांनी रिसेप्शन व्हॅन्यूवर एकमेकांचे हात पकडून एंट्री घेतली व पोज दिल्या.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला भाईजान सलमान खान उपस्थित राहिला.

त्यांच्या रिसेप्शनला रवीना टंडनने हजेरी लावली.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला काजोलही आली होती. काजोलच्या हटके लूकने लक्ष वेधून घेतलं.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला अनिल कपूर व चंकी पांडे यांनी हजेरी लावली.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला विद्या बालन व तिचे पती सिद्धार्थ रॉय कपूरही आले होते.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला आदित्य रॉय कपूरनेही हजेरी लावली.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला रिचा चड्ढा व अली फजल यांनी काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये ट्विनिंग करत हजेरी लावली.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला शर्मीन सेगल पती अमन मेहतासोबत पोहोचली.

अरबाज व त्याची भाची अलीजेह यांनी सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला हजेरी लावली.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला संगीता बिजलानी देखील उपस्थित राहिली.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला अदिती राव हैदरी तिचा होणारा पती सिद्धार्थबरोबर पोहोचली.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला सदाबहार अभिनेत्री रेखादेखील उपस्थित राहिल्या.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला दिग्गज अभिनेत्री सायरा बानूदेखील आल्या होत्या.

सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला हुमा कुरेशीने हजेरी लावली.

रॅपर हनी सिंगदेखील सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शन पार्टीमध्ये उपस्थित राहिला.

सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा त्याच्या मुलासह या सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शन पार्टीत आला होता.

अभिनेत्री संजीदा शेख सोनाक्षी व झहीरच्या रिसेप्शनला आली होती.

सोनाक्षी व झहीरचं रिसेप्शन मुंबईत पार पडलं. या रिसेप्शन पार्टीमध्ये एक हजारहून अधिक पाहुण्यांनी हजेरी लावली. बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये ही रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती.

Story img Loader