गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणारी बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या चर्चेत आहे. टेलिव्हिजनवरील डान्स रिॲलिटी शोजचं परिक्षण करणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रेने अलीकडेच कबूल केलं की जेव्हा तिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं तेव्हा तिचं नृत्यात पारंगत नव्हती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितलं की, शाहरुख खान अभिनीत ‘इंग्लिश बाबू देसी मेम’चं चित्रीकरण करताना तिला डान्स स्टेप शिकणं किती अवघड गेलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत सोनाली म्हणाली, “मी प्रशिक्षित नृत्यांगना नाही. मी प्रशिक्षित अभिनेत्रीदेखील नाही. मी कधीही थिएटर केले नाही. त्यामुळे गाणी, गाण्याचं शूटिंग हे माझ्यासाठी खूप नवीन होतं. शूटिंगदरम्यान मी कितीतरी रात्र जागून काढल्या. मी तेव्हा ज्या तणावातून जात होते त्यामुळे मला नेहमी पित्त व्हायचं. मला नेहमीच गाण्यांची भीती वाटे. तुम्ही कल्पना तरी करू शकता का की माझी कारकीर्द या गाण्यांवरच आधारित आहे ज्याची मला भीती वाटायची. काही चित्रपटांनी चांगली कमाई केली नसली तरी, त्या त्या चित्रपटातील गाणी हिट झाली होती. सगळ्याच गाण्यांमध्ये काय मला डान्स करायचा नव्हता. ‘संभाला है मैने’ हे माझं पहिलं गाण होत ज्यात फक्त मला हावभाव दाखवायचे होते आणि चालायचं होतं.”

हेही वाचा… “सूसेकी…”, सुकन्या मोनेंना पडली ‘पुष्पा-२’ च्या गाण्याची भुरळ, व्हिडीओ व्हायरल

सोनाली पुढे म्हणाली, “इंग्लिश बाबू देसी मेम या चित्रपटात सरोज खान तर मला मारायलाच तयार होत्या कारण मी नीट डान्स करत नव्हते आणि तेव्हा माझी बार डान्सरची भूमिका होती. अहमद खान सरोज खान यांचे असिस्टंट होते. ते मला माझ्या घरून तालमीच्या हॉलपर्यंत घेऊन जायचे आणि मला डान्स शिकवायचे. मी त्यांना म्हणायचे की मला नाही जमत आहे आता हे सगळं करायला, मी आता वैतागलेय. यावर ते मला म्हणायचे की एकच स्टेप कर आणि लहान मुलांसारखे ते मला चॉकलेट आणि आईसक्रिम आणून द्यायचे.”

हेही वाचा… “नजर लागणार अशी…”, ‘ठरलं तर मग’ फेम केतकी पालवचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…

सोनाली पुढे म्हणाली, ” आजवर मला माहित नाही की मी तो डान्स कसा केला. मला आठवतंय की मला प्रभुदेवाच्या भावाबरोबर डान्स करायचा होता.” सोनाली म्हणाली की तिने हे सगळ एक आव्हान म्हणून स्वीकारलं आणि ते इतकं चांगलं झालं हे पाहून तिला स्वतःला आश्चर्य वाटलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonali bendre recalls saroj khan when actress struggling to learn dance in english babu desi mem film dvr