‘नीरजा’, ‘सावरिया’, ‘संजू’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमुळे अभिनेत्री सोनम कपूर घराघरांत लोकप्रिय झाली. बाळंतपणानंतर सध्या काही काळ अभिनेत्रीने बॉलीवूडपासून ब्रेक घेतला आहे. अभिनयाबरोबरच सोनम तिच्या हटके स्टाइलसाठीही ओळखली जाते. पारंपरिक असो किंवा वेस्टर्न लूक सोनमच्या उत्तम फॅशन सेन्सची बॉलीवूडमध्ये नेहमीच चर्चा असते. सध्या अभिनेत्रीने केलेल्या अशाच एका सुंदर लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी कलाविश्वासह बॉलीवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच सेलिब्रिटी फोटोग्राफर अपेक्षा मेकर आणि आकाश अवचट यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सहभागी झाली होती. अपेक्षा ही सोनमची फार जवळची आहे. त्यामुळे लाडक्या मैत्रिणीच्या लग्नात अभिनेत्रीने खास पारंपरिक लूक केला होता.

हेही वाचा : “९ महिन्यांची गरोदर असताना ट्रेनमधून ढकललं अन्…”, मंजिरी ओकने सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग; म्हणाली…

अपेक्षा व आकाश यांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा मुंबईत पार पडला. या समारंभाला सोनम लाल रंगाची बांधणी साडी नेसून पोहोचली होती. ही साडी सोनमने खास गुजराती स्टाइलने नेसली होती.

हेही वाचा : मिस्टर अँड मिसेस ननावरे! लग्नानंतर अजिंक्यची पत्नी शिवानी सुर्वेसाठी रोमँटिक पोस्ट

लाल रंगाची गुजराची स्टाइल बांधणी साडी, हातात सुंदर बटवा, गळ्यात मोठा हार आणि त्यावर मॅचिंग लाल रंगाचे कानातले असा पारंपरिक लूक सोनमने मैत्रिणीच्या लग्नात केला होता. अभिनेत्रीच्या या देसी लूकवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, सोनमच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं, तर आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधल्यावर अभिनेत्रीने २० ऑगस्ट २०२२ रोजी बाळाला जन्म दिला. सोनमच्या लेकाचं नाव वायू असं आहे. वायूच्या जन्मानंतर सोनमने ‘ब्लाइंड’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं. लवकरच अभिनेत्री आणखी दोन बिग बजेट चित्रपटांमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.