अभिनेत्री सोनम कपूरचे नाव बॉलीवूडमधील उत्कृष्ट आणि चतुरस्त्र अभिनेत्रींच्या यादीत घेतले असते. फॅशनमध्येही सोनम कपूरचा बोलबाला आहे. गेले काही महिने तिने प्रेगन्सीमुळे चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला होता. मात्र, आता सोनम पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार आहे. लवकरच सोनमचा एक चित्रपट ओटीटवर प्रदर्शित होणार आहे. तब्बल ४ वर्षांनंतर सोनम अभिनय क्षेत्रात कमबॅक करत आहे.
हेही वाचा- ‘सत्यप्रेम की कथा’मधील ‘पसूरी’ गाण्याचं रिमेक पाहून नेटकरी संतापले; म्हणाले “गरुड पुराणात…”
सोनम कपूर लवकरच शोम माखिजाच्या ‘ब्लाइंड’ या चित्रपटात दिसणार आहे. मुलाच्या जन्मानंतर सोनमचा हा पहिला चित्रपट असेल. दरम्यान, जिओ सिनेमाने ‘ब्लाइंड’ चित्रपटाचा नवा लुक आणि रिलीज डेट समोर आली आहे. जिओ सिनेमाने आपल्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करून रिलीज डेटची माहिती दिली आहे
‘ब्लाइंड’ चित्रपटात सोनम कपूर मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय पूरब कोहली, विनय पाठक आणि लिलेट दुबे हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट कोरियन चित्रपट ‘ब्लाइंड’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात सोनम कपूर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा- “सलमान खान आमचं टार्गेट, संधी मिळताच…” गँगस्टर गोल्डी ब्रारची भाईजानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
सिरियल किलरच्या शोधात असलेल्या एका अंध पोलीस अधिकाऱ्यावर चित्रपटाची कथा दाखवण्यात आली आहे. सोनमला पहिल्यांदा अॅक्शन अवतारात पाहून चाहते खूप खूश आहेत. हा चित्रपट फेब्रुवारी २०२१ मध्ये ग्लासगो, स्कॉटलंड सारख्या भागांमध्ये शूट करण्यात आला आहे. ७ जुलै रोजी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.