बॉलिवूडमधील अभिनेत्रींनी मोठ्या उत्साहात करवा चौथ साजरा केला. मौनी रॉय, आलिया भट्ट, शिल्पा शेट्टी, राणी मुखर्जी अशा कित्येक अभिनेत्रींनी करवा चौथदरम्यानचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर केले. यामध्ये सोनम कपूरचाही समावेश आहे. सोनमनेही हा सण साजरा केला. काही दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. करवा चौथ सेलिब्रेट करत असताना तिने मुलगा वायूला मात्र आपल्यापासून दूर केलं नाही. करवा चौथसाठी मेकअप करतानाचा व्हिडीओ सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

सोनमने करवा चौथचे आधी फोटो शेअर केले. फोटो शेअर करताना तिने एक वेगळाच मॅसेज चाहत्यांपर्यंत पोहोचवला. तिचा पती आनंद आहुजाला करवा चौथच्या दिवशी पत्नीने उपवास केलेला आवडत नाही. पण हा सण मात्र दोघंही सेलिब्रेट करतात. सणानिमित्त संपूर्ण कुटुंब व मित्र परिवार एकत्र येतो असं सोनम-आनंदचं म्हणणं आहे. म्हणून यंदाही सोनमने उपवास न करता करवा चौथ साजरा केला.

आणखी वाचा – आर्थिक संकट ओढवल्यानंतर शरद पोंक्षेंनी डोंबिवलीत सुरू केला नवा व्यवसाय; त्यांनीच सांगितला किस्सा!

मुलाला स्तनपान करताना दिसली सोनम कपूर<br>त्यानंतर सोनमने एक व्हिडीओही शेअर केला आहे. यामध्ये ती मेकअप करताना दिसत आहे. तिच्या चार मेकअप आर्टिस्ट तिचा मेअकप करत आहेत. तसेच मेकअपदरम्यान सोनम मुलाला स्तनपान करताना दिसत आहे. त्यानंतर लेहेंगा व दागिने परिधान करून ती सुंदर तयार होते. तिचा हा पारंपरिक लूकही तिच्या चाहत्यांना आवडला आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ शेअर करताना तिने म्हटलं की, “आपल्या टीमबरोबर खऱ्या जगात मी पुन्हा परतले आहे. सुंदर तयार होणं, लोकांना भेटणं खरंच खूप मस्त आहे. तसेच आपल्या मातीमध्ये परतल्याचा आनंद आहे. आय लव्ह यु मुंबई.” सोनमच्या या व्हिडीओला चाहत्यांनी अधिकाधिक पसंती दर्शवली आहे.

Story img Loader