बॉलीवूडचे कलाकार अनेकदा त्यांच्या चित्रपटांबरोबरच त्यांच्या लूकमुळेदेखील चर्चेत असतात. आता अभिनेत्री सोनम कपूर(Sonam Kapoor) सध्या तिच्या कपड्यांमुळे मोठ्या चर्चेत आली आहे. कलाकारांनी केलेली फॅशन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. अनेकदा चाहते आपल्या आवडत्या कलाकारांचे अनुकरण करताना देखील दिसतात. कपडे, केसांची स्टाइल अशा अनेक बाबतीत चाहते आपल्या आवडत्या कलाकरांचे अनुकरण करत असतात. आता अभिनेत्रीने दिवाळीनिमित्त हटके ड्रेसमधील फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माती आणि खादीचा ड्रेस; दिवाळीसाठी सोनम कपूरचा खास लूक

अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देताना तिने म्हटले, “हे आऊटफीट कर्नाटकमधील लाल आणि मुलतानी मातीपासून बनवलेला आहे. त्याबरोबरच लेहेंगा आणि ओढणी ही खादीची आहे. हा पोशाख भूमीशी असलेले आपले संबंध दाखवून देतो. जिथून आपण आलो आहोत, ती आंतरिक शक्ती आणि अभिमान जागृत करणारा हा पोशाख आहे. या पोशाखाचे महत्त्व खूप आहे. या दिवाळीला आपल्या परंपरा आणि मूळांशी अशा प्रकारे स्वत:ला जोडता आले, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे”, असे म्हणत सोनमने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सोशल मीडियावर सोनम कपूरच्या या पोशाखाची चर्चा खूपच रंगताना दिसत आहे. अनेकांनी तिच्या या हटके लूक आणि पोशाखाचे कौतुक केले आहे. ती या ड्रेसमध्ये अत्यंत सुंदर दिसत असल्याचे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

सोनम कपूर ही अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी आहे. २००७ मध्ये सावरियाँ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्याबरोबर रणबीर कपूरची प्रमुख भूमिका होती. संजय लीला भन्साळी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे मोठे कौतुक झाले. या सिनेमातील तिच्या भूमिकेसाठी तिला अनेक पुरस्कारांसाठी नॉमिनेशनही मिळाले.

हेही वाचा: Video: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सोनू निगमच्या समोर अचानक आला मद्यपी अन् मग…; पाहा व्हिडीओ

तसेच, २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आय हेट लव्ह स्टोरीज’ या चित्रपटात सोनम कपूर मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. ‘दिल्ली-६’ (२००९), ‘रांझणा’ (२०१३), ‘प्रेम रतन धन पायो’, ‘डॉली की डोली’ हे चित्रपट गाजले आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले होते.

नीरजा या चित्रपटातदेखील सोनम कपूर प्रमुख भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट मोठ्या चर्चेत होता. दरम्यान, अभिनेत्री तिचे वक्तव्य आणि सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चेत असते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonam kapoor diwali special dress made up from red soil multani clay and khadi shares photo on social media nsp