बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. एका युट्यूबरने एका व्हिडीओमध्ये सोनमला मुर्ख म्हणत हिणवलं होतं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच चर्चेचा विषय बनला होता. या व्हिडीओनंतर सोनम आणि आनंद अहूजाने संबंधित युट्यूबरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

हेही वाचा- एका दिवसासाठी शाहरुख खान बनलीस तर काय करशील? अनुष्का शर्मा म्हणाली, “मन्नतच्या मागे जाऊन…”

रागिनी नावाच्या युट्युबरने सोनम कपूरचा एका व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिने सोनम कपूरचा मुर्ख असा उल्लेख केला होता. या व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रियाही दिल्या होत्या. या व्हिडीओनंतर सोनम आणि आंद अहुजा यांनी रागिनीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. संबंधित युट्यूबरने सोनम आणि तिच्या कंपनीच्या ब्रँडची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आनंद अहुजाने केला आहे.

रागिणीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये काही स्क्रिशॉर्ट शेअर करण्यात आले आहेत. रागिणीने स्टोरी शेअऱ करत लिहिलं. “सोनम कपूरवर मी जो व्हिडीओ बनवला होता तो मी डिलीट करावा असं तिच म्हणणं होतं. मी आत्तापर्यंत तिच्याबाबत कोणतंही वाईट वक्तव्य केलेलं नाही.

Story img Loader