Anand Ahuja Viral Video : बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरचा पती आनंद आहूजा हा प्रसिद्ध उद्योगपती आहे. आनंद व सोनम अनेकदा मुंबईत फिरताना किंवा डेटवर जाताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होतात. सध्या आनंदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.

आनंद पत्नी सोनमबरोबर अनेक बॉलीवूड पार्ट्यांना हजेरी लावत असतो. फिल्म इंडस्ट्रीतील इव्हेंट्समध्येही तो पत्नीबरोबर जात असतो. नुकताच आनंद आहूजाचा एक व्हिडीओ ‘फिल्मी’ज्ञान या पापाराझी अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी आनंदवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. इतका श्रीमंत असूनही आनंद खूप साधा आहे, अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत.

हेही वाचा – १३ व्या वर्षी जडलेलं ड्रग्जचं व्यसन, स्मिता पाटील यांचा मुलाचा खुलासा; प्रतीक म्हणाला, “माझी कौटुंबिक परिस्थिती…”

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसतंय की आनंद हातात पाण्याची बाटली घेऊन उभा आहे. तो भाजीपाला विकणाऱ्या एका महिलेशी गप्पा मारतो. तो तिची विचारपूस करतो. बराच वेळ तो त्या महिलेशी बोलतो. त्यांच्या आजूबाजूला इतरही लोक दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ –

आनंदचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. ‘पैसा असूनही ज्या माणसात अॅटिट्यूड नाही, तोच माणूस मनाने आणि पैशानेही श्रीमंत असतो’, अशी कमेंट एका युजरने केली आहे. ‘आनंदला खूप प्रेम,’ अशी कमेंट आणखी एका युजरने या व्हिडीओवर केली आहे.

हेही वाचा – १४ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण काय? पहिल्यांदाच बोलली ‘खल्लास गर्ल’; म्हणाली, “त्याने अत्यंत बेजबाबदारपणे…”

anand ahuja viral video
व्हिडीओवरील कमेंट्स

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहूजा यांच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. सोनम कपूरने ८ मे २०१८ रोजी उद्योगपती आनंद आहूजाशी प्रेमविवाह केला होता. हे दोघेही लग्नानंतर चार वर्षांनी आई-बाबा झाले. सोनमने २० ऑगस्ट २०२२ रोजी मुलाला जन्म दिला. सोनम व आनंदच्या मुलाचं नाव वायू आहे.

Story img Loader