सोनम कपूर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या फॅशनमुळे सोनम नेहमीच चर्चेत असते. अभिनयापासून लांब असली तरी सोनम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. आपल्या मुलगा वायूबरोबरचे फोटो शेअर करत सोनम चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान सोनमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी सोनमला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे.

हेही वाचा- दीपिका पदुकोणला ‘त्या’ विधानावरून ट्रोल करणाऱ्यांना करण जोहरने सुनावलं; म्हणाला, “तुम्हाला जे करायचंय ते…”

sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
shraddha aarya new born baby photo
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नानंतर ३ वर्षांनी झाली जुळ्या मुलांची आई, पहिल्यांदाच एका बाळाबरोबरचा फोटो केला शेअर
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

तब्बल चार वर्षानंतर सोनम कपूर रॅम्प वॉक करताना दिसली. यावेळी सोनमने पांढऱ्या रंगाचा लेहंगा घातला होता. लेहेंग्याला साजेशे दागिनेही घातले होते. तसेच सोनमने न्यूड मेकअप करत आपला लूक पूर्ण केला होता. या लूकमध्ये सोनम खूप सुंदर दिसत होती. सोनमचा रॅम्प वॉक करतानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, या व्हिडीओवरून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

सोनमच्या ‘या’ व्हायरल व्हिडीओवरुन ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट केली आहे. एकाने कमेंट करत विचारलं. “ती गरोदर आहे का? जर नसेल तर तिच्या चालण्याची पद्धत खूप विचित्र आहे.” तर काहींनी तिला रॅम्प वॉकवरूनही ट्रेल केलं आहे. नेटकऱ्यांनी सोनमला रॅम्प वॉक करता येत नसल्याचं म्हणलं आहे.

हेही वाचा- प्रकाश राज यांनी कंगना रणौतची उडवली खिल्ली; अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ रिट्वीट करत म्हणाले…

सोनमच्या कामाबाबत बोलायचं झालं तर ‘सावरिया’ चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदापर्ण केलं. या चित्रपटात तिच्याबरोबर रणबीर कपूर झळकला होता. सोनम आणि रणबीरचा तो पहिलाच चित्रपट होता. सोनम शेवटची ब्लाइंड चित्रपटात दिसली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. २०१८मध्ये सोनमने आनंद अहुजाबरोबर लग्नगाठ बांधली. गेल्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात सोनमने गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचं नाव त्यांनी ‘वायू’ असं ठेवलं आहे.

Story img Loader