अभिनेत्री सोनम कपूर आहुजा सध्या चांगलीच चर्चेत आहे. आई झाल्यावर आपल्या बाळाबरोबर ती जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. गरोदर असताना सोनमने चित्रपटातून ब्रेक घेतला होता. मुलगा वायु कपूरला जन्म दिल्यानंतर सोनम पुन्हा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे. सोनम तिच्या बिनधास्त वक्तव्यासाठी आणि तिच्या फॅशन सेन्ससाठी कायम चर्चेत असायची. सोनम तिचा मुलगा वायु कपूरचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवाय तिला बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोलदेखील केलं जातं.
नुकतंच तिने बॉलिवूडमध्य कमबॅक करायची इच्छा व्यक्त केली आहे. पीटीआयशी संवाद साधताना सोनमने तिच्या या मोठ्या ब्रेकबद्दल वक्तव्य केलं आहे. सोनम म्हणाली, “२०२२ मध्ये मी एक छान ब्रेक घेतला होता, पण लवकरच मला चित्रपटातून पुनरागमन करायची इच्छा आहे. खरं सांगायचं झालं तर हा एक अत्यंत गरजेचा आणि उत्तम ब्रेक होता, पण आता मला पुन्हा मनोरंजविश्वात यायचं आहे.”
आणखी वाचा : Shark Tank India 2 : “मला मिशी असलेली मुलगी म्हणून…” नमिता थापरने शेअर केला बॉडी शेमिंगचा ‘तो’ अनुभव
सोनम कपूरने सावरिया चित्रपटातून रणबीर कपूरसह पदार्पण केलं. हा चित्रपट फारसा चालला नसला तरी यातून सोनमला बराच मोठा ब्रेक मिळाला. पुढे आलेल्या ‘रांझणा’, ‘विरे दी वेडिंग’, ‘आऐषा’ या चित्रपटातील तिच्या भूमिकांचं कौतुक झालं. ‘नीरजा’ चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना भरपूर पसंत पडली.
गरोदर होण्याआधी सोनम कपूरने एक चित्रपट सुरू केला होता जो लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे आणि त्यासाठी सोनम चांगलीच उत्सुक आहे. सोनम कपूरचा आगामी ‘ब्लाइंड’ हा चित्रपट सुजॉय घोष दिग्दर्शित करणार आहेत. सोनमने नुकतंच मुंबईतील ट्रॅफिकबद्दल केलेल्या ट्वीटमुळे तिला चांगलंच ट्रोल केलं होतं.