बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही कायमच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी बाळाला जन्म दिल्यानंतर सोनम कपूर ही सिनेसृष्टीत पुन्हा सक्रीय झाली आहे. नुकतंच सोनम कपूरने एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिच्या या लूकमध्ये तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
सोनम कपूरने नुकतंच मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी तिने अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा अनारकली परिधान केला होता. त्यावर तिने काळ्या रंगाचे डिझायनर जॅकेट परिधान केले होते. याबरोबर तिने हाय बन, कफ एअररिंग्स आणि ऑक्साईडच्या बांगड्या परिधान केल्या होत्या. या लूकला साजेसा मेकअपही तिने केला होता.
आणखी वाचा : सोनम कपूरच्या बाळाची पहिली झलक आली समोर, बहिणीने शेअर केले फोटो
यावेळी तिने परिधान केलेल्या जॅकेटमध्ये तिने हात घातले नव्हते. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तिच्या या ड्रेसची तुलना अनेकांनी ‘शोले’ चित्रपटातील ‘ठाकूर’ या पात्राबरोबर केली. तर काहींनी तिला ड्रेसिंगबद्दल अनेक सल्ले दिले आहेत.
आणखी वाचा : “वैभव तत्त्ववादी माझा…” प्राजक्ता माळीने उघड केले मोठे गुपित
“जर तू त्या कोटमध्ये हात टाकले असतेस, तर अजून चांगली दिसली असतीस”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने “ही बाई ठाकूर असल्यासारखी का फिरत आहे?” असा प्रश्न विचारला आहे. “ज्या लोकांना हात नसतात, त्यांची मजबुरी म्हणून असे कपडे परिधान करावे लागतात आणि यांना ही फॅशन वाटते. यांचं डोकं कुठे असतं काहीही माहिती नाही”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.