१९८०-१९९० च्या दशकात एक अशी अभिनेत्री होती, जिला इंडस्ट्रीची ‘फॅशन आयकॉन’ म्हटले जात होते. ती केवळ उत्कृष्ट अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या धाडसी व्यक्तिमत्त्वासाठीही प्रसिद्ध होती. सध्या ती चित्रपटांमध्ये सक्रिय नाही; पण सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती आपले जुने फोटो आणि त्यांच्याशी संबंधित आठवणी चाहत्यांबरोबर शेअर करीत असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९८०-१९९० दशकात बोल्ड फोटोशूट करणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव आहे सोनम खान. अलीकडेच सोनमने तिचे काही जुने फोटो शेअर केले आहेत; ज्यामध्ये ती अतिशय बोल्ड अंदाजात दिसत आहे. या फोटोंमध्ये सोनम झुडपांमध्ये बसून पोज देताना दिसते. या फोटोशूटबद्दलचा खुलासा करीत सोनमने सांगितले की, या फोटोशूटनंतर तिची आई तिच्यावर खूप चिडली होती.

हेही वाचा…यामी गौतमच्या सहा महिन्यांच्या मुलाची पहिली झलक आली समोर, पती आदित्य धर पोस्ट शेअर करत म्हणाला…

सोनमने या फोटोमागचा किस्सा सांगताना कॅप्शनमध्ये लिहिले, “मी स्किन कलरचा शॉर्ट ड्रेस घालून, लांबसर गवताच्या मागे लपून फोटोशूट केलं होतं. तेव्हा मला वाटलं होतं की, मी खूप सुंदर दिसतेय. पण जेव्हा हे फोटो प्रसिद्ध झाले, तेव्हा माझी आई माझ्याजवळ ते मासिक घेऊन आली. मासिक पाहून आईनं आधी माझ्या कानाखाली मारली आणि नंतर ते मासिक फाडून टाकलं.”

सोनम खानचे बोल्ड फोटोशूट –

अलीकडेच सोनम खानने तिचे काही जुने फोटोज शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती अतिशय बोल्ड अंदाजात दिसत आहे. (Photo Credit – Sonam Khan Instagram)

सोनमने पुढे लिहिलं, “त्या काळी मी माझ्या धाडसी अंदाजामुळे ओळखली जायचे; पण माझे पालक माझ्याबद्दल नेहमी खूप प्रोटेक्टिव्ह होते. तरीसुद्धा मी नेहमी बंडखोरपणे वागायचे.”

हेही वाचा…थरारक सीन्स आणि जबरदस्त ट्विस्ट असलेले ‘हे’ सस्पेंस थ्रिलर सिनेमे आहेत प्राईम व्हिडीओवर, वाचा यादी

सोनम खानने (Sonam Khan) तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात १९८७ मध्ये आलेल्या ‘सम्राट’ या तेलुगू चित्रपटातून केली होती. या चित्रपटात यश चोप्रांना तिचे काम इतके आवडले की, त्यांनी तिला हिंदी चित्रपटांमध्ये लाँच केले. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या ‘विजय’ या यश चोप्रांच्या सिनेमातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ‘त्रिदेव’ चित्रपटातील ‘ओए ओए’ या गाण्यामुळे ती प्रसिद्ध झाली.

हेही वाचा…साई पल्लवीचा ३२२ कोटी रुपये कमावणारा चित्रपट OTT वर होणार रिलीज; कधी, कुठे पाहता येणार? वाचा

सोनम खानने हिंदी सिनेमातील अनेक मोठ्या अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. त्यामध्ये अमिताभ बच्चन, सनी देओल, चंकी पांडे, गोविंदा, चिरंजीवी व नसिरुद्दीन शहा यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonam khan bold photoshoot and the slap from mother psg