Sonam Khan Recalls Divya Bharti Memories: ८० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री सोनम खानची दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीशी खूप घट्ट मैत्री होती. अनेकदा सोनम दिव्याबद्दल बोलत असते, तिच्या आठवणींना उजाळा देत असते. दिव्याचं अकाली निधन झाल्याने फिल्म इंडस्ट्रीत मोठी पोकळी निर्माण झाली, असं सोनम म्हणते.

“ती खूप छान मुलगी होती. ती आज जिवंत असती तर आघाडीची अभिनेत्री असतील. तिच्याबरोबर जो दुर्दैवी अपघात घडला, तो घडायला नको होता, पण आता आपण काय करू शकतो,” असं सोनम ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

“प्रायव्हेट पार्ट दाखवला, दगड फेकले,” बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितले धक्कादायक अनुभव; म्हणाली, “शिक्षिकेने सांगितलं माझीच चूक…”

‘मोहरा’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी दिव्या भारती सोनमचा पूर्वाश्रमीचा पती दिग्दर्शक राजीव रायची पहिली पसंती होती. तिच्या अकाली निधनामुळे रवीना टंडन ही भूमिका साकारली. या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

मराठमोळ्या नम्रता शिरोडकरने मुलांसह केलं देवदर्शन, शेअर केले खास Photos

“मी ज्यांच्याशी लग्न केलं होतं, त्या राजीव राय यांनी दिव्याला ‘मोहरा’साठी साइन केलं होतं. या चित्रपटाचं बरंचसं शूटिंग झालं होतं. तिचा मृत्यू झाला तेव्हा मी गरोदर होते. मी चुकत नसेल तर कदाचित तिचं निधन एप्रिल महिन्यात झालं आणि माझ्या मुलाचा जन्म मे मध्ये झाला. तिच्या मृत्यूच्या काही दिवस आधी मी तिच्याशी शेवटचं बोलले होते,” असं सोनम म्हणाली.

प्रभास ‘कल्की 2898 एडी’मध्ये जोकर वाटत होता, अर्शद वारसीचं स्पष्ट मत; ‘मुंज्या’बाबत म्हणाला, “मी या चित्रपटाबद्दल खूप…”

दिव्या भारतीचं निधन ५ एप्रिल १९९३ रोजी झालं होतं. ती अवघ्या १९ वर्षांची होती. ती वर्सोवा येथील तिच्या पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीच्या खिडकीतून खाली पडली होती. या घटनेच्या काही दिवसांआधीच तिच्याशी बोलणं झालं होतं, असं सोनमने सांगितलं. “ती मला चंद्राकडे बघायला सांगायची. तुझं बाळ तुझ्यासारखंच सुंदर असेल, असं ती म्हणायची. ती एकमेव अभिनेत्री होती जिच्याशी माझं खूप चांगलं नातं होतं. ती आता जिथेही असेल तिथे आनंदी असेल अशी मी आशा करते,” असं सोनम म्हणाली.

Munjya on TV: सुपरहिट ‘मुंज्या’ OTT नव्हे तर टीव्हीवर होतोय प्रदर्शित; कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

त्या काळात दोन अभिनेत्रींची मैत्री दुर्मिळ होती, असं सोनमने नमूद केलं. फ्रेंडशिप डेच्या दिवशी सोनमने तिच्या इन्स्टाग्रामवर इंडस्ट्रीतील तिच्या दोन मैत्रिणी श्रीदेवी आणि दिव्या भारती यांना श्रद्धांजली वाहिली होती. तिने या दोन्ही दिवंगत अभिनेत्रींबरोबरचे फोटो पोस्ट केले होते.

Story img Loader