१९९० मध्ये आलेला ‘आशिकी’ चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते. यात राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांच्या मुख्य भूमिका होत्या. या सिनेमातील गाण्यांपासून ते रोमँटिक सीनपर्यंतचा प्रत्येक सीन आणि संवाद खूप गाजले होते. या चित्रपटातील एक रंजक गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे. ती अशी की आधी हा चित्रपट फक्त टीव्हीवर प्रदर्शित होणार होता आणि त्याचे बजेटही खूप कमी आहे. त्यात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या दीपक तिजोरीने नुकताच याबाबत खुलासा केला आहे.

मंजू रमाननशी बोलताना दीपक तिजोरीने चित्रपटाबद्दल काही रंजक गोष्टी सांगितल्या. “जेव्हा आशिकीची निर्मिती केली जात होती, तेव्हा त्याचे बजेट फक्त ४० लाख रुपये होते. तो चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित केला जाईल असं आम्हाला वाटत होतं. गुलशन कुमार यांनी जसा ‘लाल दुपट्टा मलमल का’ सिनेमा बनवला होता, तसाच हाही एका छोट्या चित्रपटाप्रमाणे बनवला जात होता. हा एक लहान चित्रपट आहे, असं समजून आम्ही ‘आशिकी’ चित्रपटात काम करत होतो,” असं दीपक म्हणाला.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Navri Mile Hitlarla
“तुला माझ्यासाठी…”, सुनांच्या हट्टासाठी एजेने दिली शिक्षा; लीलाचा आनंद मात्र गगनात मावेना, पाहा प्रोमो
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
chala hawa yeu dya reality show got less trp from last few years
‘चला हवा येऊ द्या’कडे प्रेक्षकांनी का पाठ फिरवली, TRP कमी का झाला? भाऊ कदम म्हणाले, “दुसऱ्या चॅनेलवरच्या कॉमेडी शोमध्ये…”
Muramba
Video: “जोपर्यंत तू रमा…”, रमासारखी दिसणारी माही व अक्षय समोरासमोर येणार का? ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा

हेही वाचा – माधुरी दीक्षितवर जडला जीव, मॅच फिक्सिंगमध्ये अडकला अन् तिने…; भारताच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूची अधुरी प्रेमकहाणी

गुलशन कुमार यांनी केली होती मदत

दीपक तिजोरीने सांगितलं की टी-सीरीजचे संस्थापक दिवंगत गुलशन कुमार यांनी चित्रपटाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी आधी त्यातील गाणी हिट केली आणि नंतर चित्रपटाच्या निर्मितीचे काम सुरू केले. या चित्रपटाचे बजेट नंतर वाढले होते. ८० लाख ते एक कोटी रुपयांमध्ये या चित्रपटाची निर्मिती झाली होती. भारतात या चित्रपटाने साडेचार कोटी, तर जगभरात या सिनेमाने पाच कोटी रुपयांची कमाई केली होती.

हेही वाचा – ‘बाहुबली’ फेम अभिनेता ४७ व्या वर्षी अडकला लग्नबंधनात, पत्नीबरोबरचा समुद्रकिनाऱ्यावरील फोटो केला शेअर

“गुलशन यांनी सर्वात आधी ‘लाल दुपट्टा मलमल का’ ची गाणी हिट होतील याची खात्री केली आणि मग त्यांनी हा चित्रपट बनवला. त्यांनी ‘आशिकी’ सिनेमाच्या बाबतीतही असंच केलं. गाणी आधी हिट होतील याची खात्री करून त्यांनी महेश भट्ट यांना चित्रपट बनवायला सांगितलं,” असं दीपक तिजोरी म्हणाला.

हेही वाचा – घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या रायने हटवलं ‘बच्चन’ आडनाव? दुबईतील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

गाणी सुपरहिट ठरल्यावर बनवलेला चित्रपट

‘आशिकी’ची गाणी नदीम-श्रवण यांनी संगीतबद्ध केली होती. या चित्रपटातील सर्वच गाणी जी खूप हिट झाली होती. गाण्यांमुळे चित्रपटाला खूप जास्त लोकप्रियता मिळाली. दीपक म्हणाला की सर्व गाणी आवडल्यानंतर गुलशन कुमार यांनी महेश भट्ट यांना आता चित्रपट बनवण्यास सांगितलं होतं. “गाणी खूप सुंदर होती, ती गाणी लोकांना खूप आवडली होती, ही गाणी लोकांना आवडली, म्हणून त्यावर चित्रपट बनवण्यात आला होता. त्यांनी भट्ट साहेबांना बोलावून गाणी ऐकवली आणि त्यांना म्हणाले, ‘यावर चित्रपट बनवायचा का?’ आणि मग महेश भट्ट यांनी चित्रपट बनवला. यात इतर काही नवीन गाणी टाकण्यात आली होती,” असं दीपक तिजोरी म्हणाला.

Story img Loader