Sonnalli Seygall Announces Pregnancy: ‘प्यार का पंचनामा’ फेम लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री सोनाली सेहगल आई होणार आहे. वर्षभरापूर्वी सोनालीने व्यावसायिक बॉयफ्रेंड आशीष सजनानीशी लग्न केलं. आता तिने गूड न्यूज दिली आहे. सोनालीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१५ ऑगस्ट रोजी टीव्हीवरील ‘गोपी बहू’ म्हणजेच देवोलिना भट्टाचार्जीने प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. आता एका दिवसानंतर बी-टाऊनची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली सहगल हिने आनंदाची बातमी दिली आहे. लग्नाच्या एक वर्षानंतर सोनाली आई होणार आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री होणार आई, दीड वर्षांपूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न

३५ वर्षीय सोनाली सहगलने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट घोषणा करून गूड न्यूज दिली आहे. तिने तीन फोटो शेअर केले आहेत, ज्यात एका फोटोमध्ये तिचा बेबी बंप दिसतोय आणि ती काहीतरी खाताना दिसत आहे. तर तिच्या शेजारी तिचा पती बिअरची बाटली आणि हातात एक बाळाच्या दुधाची बाटली धरलेला दिसत आहे. अभिनेत्रीच्या समोर बेडवर चिप्स, बिस्किट व पुस्तकं दिसत आहेत.

सोनाली सहगल व आशिष सजनानी (फोटो – इन्स्टाग्राम)

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केलं होतं अरेंज मॅरेज, कोण आहेत त्यांचे पती? जाणून घ्या

सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिलं, “बिअरच्या बाटल्यांपासून बाळाच्या दुधाच्या बाटलीपर्यंत आशिषचे आयुष्य बदलणार आहे. माझ्या बाबतीत काही गोष्टी तशाच राहतील. आधी मी माझ्यासाठी खायचे आता दोघांसाठी खाते. दुसरीकडे समशेर (सोनालीचा श्वान) चांगला मोठा भाऊ होण्यासाठी नोट्स काढत आहे. मी खूप कृतज्ञ व आनंदी आहे. प्रार्थना करा.” सोनालीच्या बाळाचा जन्म डिसेंबरमध्ये होईल असंही तिने सांगितलं.

“५ महिन्यांपूर्वी बाबा होतास, आता कोण झालास!” विकी कौशलला सॅम मानेकशॉ यांच्या मुलीने केला मेसेज; अभिनेता म्हणाला…

सोनाली सहगलने ७ जून २०२३ रोजी बिझनेसमन आशिष सजनानीशी लग्न केलं. या जोडप्याने पाच वर्षे एकमेकांना गुपचूप डेट केलं होतं. त्यानंतर मुंबईत लग्नगाठ बांधली. आता सोनालीने फोटो पोस्ट करून ती आई होणार असल्याचं सांगितलं आहे. सोनालीच्या या फोटोंवर चाहते व बॉलीवूड सेलिब्रिटी कमेंट्स करून शुभेच्छा देत आहेत.

सोनाली ‘प्यार का पंचनामा’, ‘जय मम्मी दी’, ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टिटू की स्विटी’, ‘सेटर्स’, ‘हायजॅक’, ‘वेडिंग पुलाव’, ‘बुंदी रायता’, ‘नुरानी चेहरा’, ‘जाने कहां से आई है’ या चित्रपटांसाठी ओळखली जाते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonnalli seygall announces pregnancy with husband ashesh sajnani hrc