गायिका नेहा कक्कर(Neha Kakkar) काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. मेलबर्नमधील तिच्या कॉन्सर्टमुळे तिची सगळीकडे चर्चा होताना दिसली होती. काही दिवसांपूर्वी नेहा कक्करचा मेलबर्नमध्ये एक कॉन्सर्ट शो आयोजित केला गेला होता. या कॉन्सर्टला ती उशिरा पोहोचली आणि तिच्या उशिरा येण्याने उपस्थित प्रेक्षकही तिच्यावर चांगलेच भडकले होते. नेहा जेव्हा स्टेजवर आली, तेव्हा भडकलेल्या चाहत्यांनी तिला परत जाण्यास सांगितले. त्यानंतर तिला रडू कोसळले. तिने आयोजकांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी तिची व तिच्या टीमची व्यवस्था केली नसल्याचे तिने म्हटले होते. तिच्या या आरोपांवर आयोजकांनी तिचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आणि नेहा कक्करमुळे मोठे नुकसान झाल्याचे आरोप तिच्यावर केले होते. आता गायिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिच्या बहिणीने म्हणजेच सोनू कक्करने नेहा व टोनी कक्कर यांच्याबरोबरचे संबंध तोडले असल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
मी खरोखरच निराश…
सोनू कक्करने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सोनू कक्करने लिहिले, “तुम्हा सर्वांना कळवताना खूप दुःख होत आहे. यापुढे मी दोन टॅलेंटेड सुपरस्टार टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांची बहीण नाही. भाविनक वेदनांतून मी हा निर्णय घेतला आहे. आज मी खरोखरच निराश आहे”, असे लिहीत सोनू कक्करने नेहा व टोनी या तिच्या भावंडांशी संबंध तोडल्याचे जाहीर केले. तसेच ती दु:खी असल्याचे तिने या पोस्टमध्ये नमूद केले. आता ही पोस्ट तीने डिलीट केल्याचे दिसत आहे.
सोनू कक्करदेखील नेहाप्रमाणे गायिका आहे. लोरी सुना, लंडन ठुमकदा, जमाना बदल गया, बाबुजी जरा धीरे चलो, मदारी अशा अनेक गाण्यांना तिने आवाज दिला आहे. आता सोनू कक्करच्या या पोस्टने चाहत्यांना धक्का बसला आहे. नेमके कोणत्या कारणांमुळे तिने असे म्हटले, असा प्रश्नही चाहत्यांना पडला असल्याचे सोशल मीडियावरील कमेंट्समध्ये पाहायला मिळत आहे. सोनू कक्करच्या पोस्टवर टोनी व नेहा कक्करने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता या सगळ्यावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, नेहा गाण्यांबरोबच रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक असल्याचेदेखील दिसते. तसेच ती सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. तिची अनेक गाणी गाजली आहेत. तिच्या पंजाबी गाण्यांनाही श्रोत्यांचे विशेष प्रेम मिळाले आहे.