सुप्रसिद्ध गायक सोनू निगमचं नाव न घेता पाकिस्तानी गायकाने गाणं चोरीचा आरोप केला होता. पाकिस्तानी गायक ओमर नदीमने केलेल्या आरोपांवर सोनूने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने उमरच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करत आपली बाजू मांडली, तसेच उमरची माफीही मागितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमर नदीमने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एका गाण्याचा व्हिडिओ शेअर केला होता आणि कोणाचेही नाव न घेता टीका केली होती. गाण्याची चोरी करायची असेल तर किमान कलाकाराला श्रेय तरी द्यायला पाहिजे असं उमर म्हणाला होता. सोशल मीडिया युजर्सना सोनू निगमचं नवीन गाणं ‘सून जरा’ आणि उमर नदीमच्या गाण्यात साम्य आढळलं. त्यानंतर हे प्रकरण सुरू झालं. आता उमर नदीमच्या या पोस्टवर सोनू निगमने कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आधी उमर नदीमची माफी मागितली व नंतर घडलेला प्रकार सांगितला.

सोनूने गायलेलं गाणं केआरकेवर चित्रीत करण्यात आलं आहे. सोनू निगम म्हणाला, “माझा या गाण्याशी काहीही संबंध नाही. मला दुबईत माझे शेजारी असलेल्या केआरके (कमाल आर खान) यांनी गाण्याची विनंती केली होती आणि त्यानंतर मी त्यांना नकार देऊ शकलो नाही. मी सर्वांसाठी गाणं गात नाही. पण जर मी उमरचं गाणं ऐकलं असतं तर मी हे गाणं कधीच गायलं नसतं.”

२० व्या वर्षी लग्न, १८ वर्षांची मुलगी अन् १९ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट; मराठमोळी अभिनेत्री करणार दुसरं लग्न? म्हणाली…

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांचं मराठी ऐकलंत का? म्हणाले, “माझं मराठी…”

सोनू निगमला उत्तर देत उमर नदीम म्हणाला, “मी तुमच्याशी सहमत आहे, तुम्ही चोरी केली, असं मी म्हटलेलं नाही. पण या बातमीने नेहमीप्रमाणे वेगळं वळण घेतलं. मी तुमची गाणी ऐकत मोठा झालो आहे आणि तुमच्याकडून खूप काही शिकलो आहे. मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. लव्ह यू! या ड्रामामध्ये सामील असलेल्या ‘खऱ्या पात्रां’बद्दल बोलायचं झाल्यास ते माझ्या रडारवरही नाहीत. त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे गोल्डफिशला क्वांटम फिजिक्स शिकवण्यासारखं आहे. जे कोणत्याच कामाचं नाही, कारण ते समजूच शकणार नाही. यापुढे मी फक्त महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करेन.”

फक्त पाच चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रीने शाहरुख खानसह दिग्गजांना टाकलं मागे, ‘या’ बाबतीत पटकावला पहिला क्रमांक

पुढे सोनू उमर नदीमला म्हणाला, “तू माझ्यापेक्षा चांगलं गायलं आहेस. मला वाईट वाटतंय की मी तुझे गाणं ऐकलं नव्हतं. मी ते आता ऐकलं, खूप छान गाणं आहे आणि तू माझ्यापेक्षा चांगलं गायलं आहेस. तुला खूप सारे आशीर्वाद. तुला खूप आदर आणि प्रेम मिळो.” यावर उमर म्हणाला, “तुमचा हा मेसेज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सध्या या जगात तुमच्यापेक्षा चांगला व बहुमुखी गायक कोणीही नाही. मी तुमचा खूप आदर करतो.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonu nigam apologies to pakistani singer omer nadeem after his plagiarism allegations hrc
Show comments