ऑनलाइन फसवणुकीच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. सोशल मीडियावर फेक अकाऊंट्स बनवून अगदी सहज कोणालाही फसवले जाते. गेल्या काही दिवसांत काही नामवंत, प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाने सामान्य माणसांकडून पैसे उकळण्याचा प्रकार सुरु झाला आहे. गायक सोनू निगमने अशीच एक पोस्ट शेअर करून त्याच्या चाहत्यांना आणि सामान्य नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा : “मी ढसाढसा रडलो”, मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितली पहिल्या डेटची आठवण; म्हणाला, “त्यानंतर कोणत्याच स्त्रीबद्दल…”

shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Image of a lottery ticket
स्वप्नात दिसलेल्या नंबरचे लॉटरी तिकिट घेतले अन् महिला जिंकली ४२ लाख रुपये; पती म्हणाला, “मला काही हे…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”

सोनू निगमने त्याच्या चाहत्यांना सावधतेचा इशारा देऊन या पोस्टमध्ये काही स्क्रीनशॉट्स जोडले आहेत. इरिका मायकल या फेक अकाऊंटवरून सोनू निगमच्या नावाने पैसे मागत असल्याचे या स्क्रीनशॉट्समध्ये दिसत आहे. “मी सोनू निगमच्या सोशल मीडिया मॅनेजमेंटमधून बोलत आहे. त्याच्या काही लकी आणि सक्रिय चाहत्यांना संपर्क करून आम्ही थेट सोनू निगमशी त्यांचे बोलणे करून देणार आहोत.” असा मेसेज फेक अकाऊंटवरून सोनू निगमच्या एका चाहत्याला करण्यात आला आहे.

हेही वाचा : Video: अभिनेत्री तेजश्री प्रधानने चाहत्यांसाठी दिली खुशखबर, लवकरच….

सोनू निगमला चॅरिटेबल ट्रस्टसाठी पैसे हवे आहेत असे खोटे मेसेज करून या हॅकरने इन्स्टाग्राम युजरकडून पैशांची मागणी केली. या हॅकरने पे-पल ॲपची लिंक, नाव असे सर्वकाही पाठवून सोनू निगमच्या चाहत्याकडे पैसे मागितले. तसेच पैसे पाठवल्यानंतर मला रिसिट पाठवा असे सांगून त्याची फसवणूक केली.

सोनू निगमला याबाबत माहिती मिळाल्यावर त्याने संपूर्ण घटनेची दखल घेऊन फेसबुकवरील त्याचे चाहते आणि अन्य युजर्ससाठी पोस्ट शेअर केली आहे. यात गायक लिहितो, “माझ्या प्रिय कुटुंबीयांनो आणि मित्रांनो…कोणीतरी माझ्या नावाने पैसे कमावण्याचा प्रयत्न करत आहे. एकदा हे चॅट्स नीट पाहा आणि सावध राहा…”

हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्याने ग्रीक गर्लफ्रेंडशी गुपचूप उरकलं लग्न, १० वर्षांपूर्वी झालेली पहिली भेट; म्हणाला, “मला तिथेच…”

दरम्यान, सोनू निगमच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी सोशल मीडिया हॅकर्स आणि ऑनलाइन फसवणुकीबाबत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, “सर्वांनी नेहमी सावध राहणे गरजेचे आहे…सोनू सर, तुम्ही याची तक्रार करा” असे कमेंटमध्ये म्हटले आहे. तर, दुसऱ्या एका युजरने “हे हॅकर्स खूप हुशार असतात, या लोकांवर कारवाई करणे गरजेचे आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अन्य काही युजर्सनी या प्रकरणाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवल्याबद्दल सोनू निगमचे आभार मानले आहेत.

Story img Loader