अनेक प्रसिद्ध गायकांचे सातत्याने लाइव्ह कॉन्सर्ट होत असतात. या कॉन्सर्टमध्ये बऱ्याच चांगल्या, वाईट घटना घडत असतात. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एका तरुणाने प्रेयसीला प्रपोज केलं होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सध्या असाच एक सोनू निगमच्या ( Sonu Nigam ) लाइव्ह कॉन्सर्टमधला व्हिडीओ व्हायरल होतं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लाइव्ह कॉन्सर्टमधील सोनू निगमचा ( Sonu Nigam ) व्हिडीओ पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. स्टेजवर असं काही घडलं, ज्याकडे त्याने लक्ष न देता त्याच्या कामावर लक्ष दिलं. त्याचा सूर जराही चुकला नाही. त्यामुळे सोनू निगमचं कौतुक होतं आहे. पण, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सोनूबरोबर नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

हेही वाचा – Video: “लवकर लग्न करा”, ‘बिग बॉस मराठी’ फेम वैभव चव्हाण आणि इरिनाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्हाला वहिनी हिच पाहिजे”

सोनू निगमच्या ( Sonu Nigam ) लाइव्ह कॉन्सर्टमधला हा व्हिडीओ त्याच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सोनू निगम ‘फिर मिलेंगे चलते-चलते’ गाताना दिसत आहे. याच वेळी एक मद्यपी अचानक स्टेजवर येतो आणि तो सोनू निगमकडे जातो. पण तितक्यात सोनू सावध होतो. तो दुसऱ्या बाजूला धावत जातो. तसंच सुरक्षेसाठी असलेला बाउंसर येतो आणि त्या मद्यपीला बेदम मारायला लागतो. अखेर सर्व सिक्युरिटी त्या व्यक्तीला स्टेजवरून घेऊन जातात. हे सर्व काही एकाबाजूला घडतं असलेलं दिसत असलं तरी दुसऱ्या बाजूला सोनू निगमने गायाचं काही थांबवलं नाही. तो नीट गातचं राहिला. सोनू निगमच्या या व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: अखेर विवियन डिसेना आणि करणवीर मेहरामध्ये पडली वादाची ठिणगी, करण म्हणाला, “एक नंबरचा मुर्ख माणूस”

हेही वाचा – पृथ्वीक प्रतापनंतर ‘हा’ लोकप्रिय मराठी अभिनेता लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नाची तारीख विचारताच म्हणाला…

सोनू निगमच्या ( Sonu Nigam ) या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “अरिजीत सिंहने बरोबर म्हटलं होतं. सोनू निगम कधीच बेसूर गाऊ शकत नाही.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, काहीही होवो गाणं सोडलं नाही पाहिजे. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “हॅट्स ऑफ सूर.” याशिवाय काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की, त्या व्यक्तीला इतकं मारायला नाही पाहिजे होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonu nigam keeps singing as he dodges man charging at him during live concert video viral pps