बॉलीवूडमधील लोकप्रिय गायक सोनू निगम आपल्या सुरेल आवाजाने आजवर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत आला आहे. ‘अग्निपथ’मधील ‘अभी मुझ मे कही’,  ‘कल हो ना हो’चं टायटल साँग अशा अनेक गाण्यांत आपल्या जादुई आवाजंने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सोनूचा आवाज ऐकण्यासाठी त्याच्या कॉन्सर्टला गर्दी करतात; पण त्यांना सोनूला प्रत्यक्षात भेटण्याची संधी मिळत नाही. मात्र, नुकतीच सोनूच्या एका छोट्या चाहत्याला अशी संधी मिळाली. एवढेच नाही, तर सोनूनं चाहत्याच्या अनोख्या टॅलेंटचं कौतुक करीत त्याला एक सरप्राइज दिलं.

सोनू निगम एका कार्यक्रमाला आला होता. त्याला पुढे जायचं असल्यानं तो घाईतच त्याच्या गाडीत बसणार तितक्यात एक मुलगा त्याच्याजवळ येऊन ‘बीट बॉक्सिंग’ करतो. सोनू त्याचं बीट बॉक्सिंग ऐकून त्याचं कौतुक करतो. सोनू पुढे अशी कृती करतो की, चाहते त्याचं कौतुक करतात.

हेही वाचा…अक्षय कुमारच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘या’ सिनेमाचा येणार सिक्वेल, चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होताच निर्मात्यांनी केली घोषणा

सोनू त्याच्या छोट्या चाहत्याचं बीट बॉक्सिंग ऐकून कौतुकानं त्याच्याकडे पाहतो. त्याच्या गालावरून हात फिरवतो. त्यानंतर सोनू त्याला म्हणतो, “मी तुझ्यासाठी कोणतं गाणं गाऊ हे मला सांग.” त्यावर चाहता म्हणतो, “कुठलंही गाणं चालेल.” मग सोनू ‘ये दिल’ हे गाणं गातो. आणि सोनूचा छोटा चाहता त्यावर बीट बॉक्सिंग करतो. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून, चाहते सोनूचं कौतुक करीत आहेत.

SONU NIGAM FANS COMMENTED ON POST
सोनू आणि त्याच्या चाहत्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून, चाहते सोनूचं कौतुक करीत आहेत. (Photo Credit – Viral Bhaiyani)

एका चाहत्यानं या व्हिडीओवर कमेंट करीत लिहिलं, “सोनू, तू खरा लिजेंड आहे. तू खूप नम्र व्यक्ती आहेस. त्यामुळेच मी तुझा नेहमीच चाहता राहिलो आहे. “दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, “खऱ्या लिजेंडला खऱ्या टॅलेंटची ओळख असते.” आणखी एका चाहत्यानं कमेंट करीत लिहिलं, “सोनूला त्याच्या स्टारडमचा अजिबात गर्व नाहीये.

हेही वाचा…शाहरुख-सलमानची प्रमुख भूमिका, कौटुंबिक ड्रामा अन्…; ३० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ‘हा’ चित्रपट, हृतिक रोशनशी आहे खास कनेक्शन

सोनू निगमच्या चाहत्याने त्याच्यासमोर बीट बॉक्सिंगची कला सादर केली. या व्हिडीओवर सोनू निगमच्या चाहत्याने कमेंट केली आहे. (Photo Credit – Viral Bhaiyani)

दरम्यान, सोनू निगमचं ‘भूल भुलैया ३’मधील ‘मेरे ढोलना ३.०’ हे गाणं प्रचंड व्हायरल होत असून, चाहते स्वतः हे गाणं गात त्यावर रील तयार करीत आहेत.

Story img Loader