सोनू निगम हा लोकप्रिय गायक आहे. त्याने आतापर्यंत बॉलीवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत. अशाच त्याने गायलेल्या एका गाण्याबद्दल त्याचं वक्तव्य चर्चेत आहे. हे गाणं एआर रेहमान यांनी बनवलं होतं, तर सोनूने गायलं होतं. ‘ब्लू’ चित्रपटातील ‘चिगी विगी’ या गाण्यात अक्षय कुमार व कायली मिनॉग झळकले होते. हे गाणं आपल्याला अजिबात आवडलं नाही, असं सोनूने म्हटलं आहे.
‘रेड एफएम इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सोनू म्हणाला, “चिगी विगी हे खूप वाईट गाणं आहे. मला हे गाणं अजिबात आवडत नाही. रेहमान यांनी इतकं वाईट गाणं का बनवलं हे मला कळत नाही. मुख्य म्हणजे कायली मिनॉगला घेऊन ते इतकं वाईट गाणं कसं बनवू शकतात. मला बरं वाटलं की त्यांनी गाणं गाण्यासाठी माझी निवड केली, परंतु कायली मिनॉगला घेऊन यापेक्षा चांगल्या दर्जाचं गाणं नक्कीच बनवता आलं असतं.”
“कोणाच्या बापाची हिंमत नाही की…”, अक्षय कुमार स्पष्टच बोलला; म्हणाला, “सगळे मला…”
सोनू पुढे म्हणाला, “पण कधी कधी रेहमानकडूनही चुका होऊ शकतात. पण मला गाणं अजिबात आवडत नाही. गाणं अजून चांगलं होऊ शकलं असतं. कायली मिनोगला घेऊन आम्ही तिच्या लेव्हलचं गाणं नक्कीच बनवू शकलो असतो. मी हे गाणं स्टेजवर गाऊन ते पुन्हा चांगलं करण्याचा खूप प्रयत्न केला.”
या चित्रपटात दिसल्यानंतर कायलीला भारतात खूप लोकप्रियता मिळाली होती. “एआर रेहमानबरोबर काम करणं हा खूप चांगला अनुभव होता. माझ्यासाठी ही एक वेगळी स्टाइल होती पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे खूप लोकांनी ते गाणं लक्षात ठेवलं. आजही त्यांनी ते गाणं ऐकलं की ते माझा उल्लेख करतात,” असं कायली ‘एएनआय’शी बोलताना म्हणाली होती.