‘अपने’, ‘पापा मेरी जान’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘बोल चुडिया’, अशा गाण्यांसाठी सोनू निगम(Sonu Nigam)ची ओळख आहे. एक लोकप्रिय गायक म्हणून त्याची ओळख आहे. चित्रपटातील गाण्यांबरोबर त्याच्या कॉन्सर्टलादेखील प्रेक्षक दाद देताना दिसतात. सोनू निगमचा चाहता वर्ग मोठा असल्याचे पाहायला मिळते. त्याच्या कॉन्सर्टला मोठी गर्दी होताना दिसते. आता सोनू निगमचा कोलकातामध्ये एक कॉन्सर्ट पार पडला. त्यामध्ये सोनू निगमचा संताप अनावर झाल्याचे एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले.

सोनू निगम काय म्हणाला?

१० फेब्रुवारीला सोनू निगमचा एक कॉन्सर्ट पार पडला. एका चाहत्याने या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, सोनू निगम स्टेजवर असून, उपस्थित असलेले काही चाहते जागेवर उभे राहिले आहेत. सोनू निगम उभे असलेल्या चाहत्यांना म्हणतो की, तुम्हाला उभेच राहायचेच असेल, तर तुम्ही निवडणुकीत उभा राहा. कृपया लवकर खाली बसा. माझा यामध्ये किती वेळ जातोय, हे तुम्हाला माहितेय का? लवकर खाली बसा.

सोनू निगमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकांनी यावर कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “त्याने बरोबर केले.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले, “मॅनेजमेंट खूपच खराब आहे. त्याला स्वत:च गर्दी नियंत्रणात आणावी लागत आहे,” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “हे पाहून खूप वाईट वाटले. इतक्या मोठ्या गर्दीला एका कलाकारानं नियंत्रित करावं, अशी अपेक्षा तुम्ही कशी करू शकता?”

याबरोबरच आणखी काही नेटकऱ्यांनी मॅनेजमेंट वाईट असल्याचे म्हणत ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे म्हटले आहे. “हे सगळे त्याला स्वत:च करावं लागत आहे. कारण- त्याला माहीत आहे की, अशा मॅनेजमेंटमुळे के केबरोबर काय घडले होते.”

दरम्यान, सोनू निगम हा त्याच्या गाण्यांमुळे मोठ्या चर्चेत असतो. याबरोबरच तो अनेक रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही सहभागी होताना दिसतो. सोशल मीडियावरही गायक म्हणून सक्रिय असून, त्याच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे.

Story img Loader