सोनू सूद (Sonu Sood) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांनी आशुतोष गोवारीकर यांच्या २००८ मधील ‘जोधा अकबर’ चित्रपटात ऑनस्क्रीन भाऊ-बहिणीची भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनूने चित्रपटाच्या सेटवरील अनुभव आणि ऐश्वर्या रायबरोबरचा त्याच्या कायम लक्षात राहिलेल्या संवादाबद्दल सांगितले.

सोनूने ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “मला आठवतंय, ‘जोधा अकबर’ सेटवर मी आणि ऐश्वर्या राय एक सीन करीत होतो. ती बोलत होती आणि अचानक थांबली. ती म्हणाली, ‘तू मला पापा (अमिताभ बच्चन)ची आठवण करून देतोस.’ ती खूप गोड आहे आणि उत्कृष्ट को-स्टार आहे. माझं त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर चांगलं नातं आहे. अभिषेकबरोबर मी ‘युवा’ आणि ‘हॅप्पी न्यू इयर’ सिनेमांत काम केलं आहे. अमिताभ बच्चनसरांबरोबर मी ‘बुड्ढा होगा तेरा बाप’मध्ये काम केलं आहे. ते खूप छान लोक आहेत, त्यांच्याबरोबर काम करणं नेहमीच मजेशीर असतं.”

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
jaya bachchan on amitabh bachchan and rekha affair
जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांवर केलेलं ‘ते’ वक्तव्य; म्हणालेल्या, “तर माझं आयुष्य…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”

हेही वाचा…पोलीस आले अन्…; जेव्हा राणी मुखर्जीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये लपलेला विवेक ऑबेरॉय, नेमकं काय घडलेलं?

काही काळापूर्वी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये उपस्थित असताना सोनूने सांगितले होते की, इजिप्तच्या प्रवासादरम्यान लोकांना तो अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आहे, असे वाटले होते. “मी जसा इजिप्तला पोहोचलो, तिथल्या लोकांना मी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मुलगा आहे, असं वाटलं. ते म्हणाले, ‘अमिताभ बच्चनचा मुलगा, अमिताभ बच्चनचा मुलगा.’ त्यामुळे मला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली. त्यांनी मला रांगेतून बाहेर काढलं आणि वेगळं नेलं. मला खूप चांगलं वाटलं,” असे तो म्हणाला.

हेही वाचा…‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”

त्याच एपिसोडमध्ये सोनूने ‘बुड्ढा होगा तेरा बाप’च्या एका सीनबद्दल सांगितले. या सीनमध्ये त्याला अमिताभ बच्चन यांना ढकलायचे होते. “बच्चन सर पोलीस स्टेशनमध्ये येतात. मी पोलीस ऑफिसरची भूमिका साकारत होतो आणि मला त्यांना मागे ढकलून सांगायचं होतं, ‘निकल जाओ पोलीस स्टेशन से’. मी दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांना सांगितलं, ‘तुम्ही मला त्यांना नमस्कार करण्याऐवजी ढकलायला सांगत आहात.’ मग मी त्यांना हळूच ढकललं. पण बच्चन सर म्हणाले, ‘घाबरू नकोस, जोरात ढकल.’ आणि शेवटी मी घाबरतच त्यांना जोरात ढकललं आणि तो सीन छान झाला,” असे सोनूने सांगितले. सोनू सूद लवकरच ‘फतेह’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून, त्यात तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

Story img Loader