अभिनेता शाहिद कपूर हा सध्या सिनेसृष्टीपासून दूर असला तरी त्याचा चाहता वर्ग अद्याप कायम आहे. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. शाहिद कपूर आणि अभिनेत्री अमृता राव यांची प्रमुख भूमिका असलेला विवाह चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडीत काढले होते. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. यात शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या जोडीचे विशेष कौतुक करण्यात आले. मात्र तब्बल १६ वर्षांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी शाहिदबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
विवाह हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या अभिनयाचे फार कौतुक करण्यात आले. या चित्रपटातील कथाही हिट ठरली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन केले होते. नुकतंच या चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी शाहिद कपूरबद्दल अनेक खुलासे केले आहेत. या चित्रपटाचे शूटींग करताना शाहिद कपूरने अनेकदा ठरलेल्या पोशाखांवर आक्षेप घेतला होता, असा आरोप सूरज बडजात्या यांनी केला आहे.
आणखी वाचा : “हे माझे…” ड्रेसिंग स्टाईलवरुन प्रश्न विचारणाऱ्या चाहतीला श्रेया बुगडेने दिले स्पष्ट शब्दात उत्तर
नुकतंच सूरज बडजात्या यांनी पिंकविला या वेबसाईट मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विवाह चित्रपटाबद्दल अनेक गौप्यस्फोट केले. विवाह चित्रपटाच्या शूटींगदरम्यान शाहिदला अरेंज मॅरेज म्हणजे काय असते याची कल्पनाच नव्हती. त्यावरुन मी अनेकदा त्याला चिडवायचो. त्याची मस्करी करायचो. कारण त्याला अरेंज मॅरेजबद्दल काहीही माहिती नव्हती. पण त्यानंतर त्याने खऱ्या आयुष्यात मात्र मीरा राजपूतबरोबर अरेंज मॅरेज केले.
“मला अजूनही आठवते की या चित्रपटात शाहिदने प्रेम हे पात्र साकारले होते. यात प्रेम हा एका मुलीला म्हणजेच पूनम (अमृता राव) ला लग्नाला बघण्यासाठी जातो, असे एक दृश्य होते. यावेळी मी शाहिदला तू हे कपडे घाल असे सांगितले होते. मात्र शाहिद कोट आणि जीन्स घालून तिथे आला. त्यावर मी चिडलो आणि त्याला विचारले, शाहिद मी तुला वेगळे कपडे परिधान कर असे सांगितले होते, तू हे कपडे का घातले आहेस, तू मुलगी बघण्यासाठी जातो आहेस, याची तुला कल्पना आहे ना??? त्यावर तो म्हणाला, मला कॅज्युअल राहायला आवडते. कॅज्युअल वैगरे सर्व ठिक आहे, पण एक ड्रेस ठरलेला असतो. त्यावर तो म्हणाला, नाही सूरज, मी असाच आहे आणि माझ्या लग्नालाही असेच कपडे घालून जाणार आहे. त्यावर मी त्याला ठिक आहे, असे सांगत विषय सोडून दिला.”
आणखी वाचा : “तिचे पहिले प्रेम…”, शाहिद कपूरने पत्नीच्या नकळत शेअर केला ‘तो’ व्हिडीओ
यानंतर याच चित्रपट विवाहसोहळ्याचा एक सीन दाखवण्यात आला आहे. त्यावेळी शाहिद कपूरला लग्नाच्यावेळी फेटा घालायचा होता. मात्र त्याला हा फेटा बांधण्याचा प्रचंड राग आला होता. त्याने मला चित्रीकरणादरम्यान विचारले, “हा फेटा घालणे गरजेचे आहे का, तो का घालायचा?” त्यावर मी त्याला ‘तुला घालावा लागेल’, असे सांगितले. तेव्हाही तो चिडला होता.
दरम्यान शाहिद कपूर आणि अमृता रावची प्रमुख भूमिका असलेला विवाह हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहिद आणि अमृता व्यतिरिक्त आलोक नाथ, अनुपम खेर, समीर सोनी आणि सीमा बिस्वास या कलाकारांनीही उत्तम भूमिका साकारली होती. शाहिद आणि अमृताच्या जोडीला आणि दोघांच्या अभिनयाला प्रेक्षक-समीक्षकांकडून खूप वाहवा मिळाली होती.