अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणातून बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाडून हा निर्णय देण्यात आला आहे. १० वर्षांनंतर या प्रकरणी निर्णय आला आहे. निकालानंतर सूरज आणि त्याचे कुटुंब खूप आनंदी आहे. निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सुरजने जियाच्या आईवर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा- Rishi Kapoor Death Anniversary: ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर भावनिक; पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “प्रत्येक वेळी..”

Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
pakistan hit & run case accused natasha danish
Video: पाकिस्तानमध्ये हिट अँड रन; बड्या उद्योगपतीच्या मुलीला पीडित कुटुंबानं केलं माफ, कायद्याच्या कचाट्यातून सुटका!
Jagdish Tytler indicted after 40 years in anti-Sikh riots case
शीखविरोधी दंगलप्रकरणी जगदीश टायटलर यांच्यावर ४० वर्षांनी दोषारोप… काय होते प्रकरण?
Outrage in Israel over hostage killing
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये संताप,नेतान्याहू जबाबदार असल्याचा आरोप; युद्ध थांबवण्याची मागणी
Raj Thackeray, Jay Malokar, Raj Thackeray Consoles Jay Malokar family, raj Thackeray akola visit, MNS, Jay Malokar, Akola visit, Raj Thackeray Vidarbha tour
अकोला : जय मालोकारच्या कुटुंबाचे राज ठाकरेंकडून सांत्वन, घातपात झाल्याचा…
Hersh Goldberg Polin Hamas hostage
हमासने अपहरण केलेल्या तरुणाचे पालक डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनच्या मंचावर, सुटकेची केली विनंती; कोण आहे हर्ष गोल्डबर्ग-पॉलिन?

सूरज पांचोलीने अलीकडेच ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी जिया खानला फक्त ५ महिन्यांपासून ओळखत होतो. ती माझी चांगली मैत्रीण होती. त्यावेळी मी फक्त २० वर्षांचा होतो आणि माझे संपूर्ण लक्ष माझ्या करिअरवर होते. एक मित्र म्हणून मी जिया खानला जमेल तशी मदत केली. त्या वयात मला माझी नीट काळजी घेता आली नाही, पण माझ्यापेक्षा काही वर्षांनी मोठ्या असलेल्या जियाची काळजी घेण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. पण त्यावेळी जियाला कुटुंबाची जास्त गरज होती. जे कधीच एकत्र नव्हते. जिया वयाच्या १६ व्या वर्षापासून तिच्या कुटुंबाची काळजी घेत होती. तेव्हा जियाला प्रेमाची गरज होती, मदतीची गरज होती, तेव्हा मी इथे होतो, तिचे कुटुंब तिच्यासोबत नव्हते. तिचे कुटुंब तिची आई सर्व लंडनमध्ये राहत होती.

हेही वाचा- Video : श्रीनगरमध्ये शाहरुख खानला चाहत्यांनी घेरलं; गर्दी बघून अभिनेत्याची झाली होती ‘अशी’ अवस्था

सूरज पांचोली पुढे म्हणाला की, जिया खानने कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक समस्या आणि मानसिक आजारामुळे आत्महत्या केली. मी जियाची आई राबिया खान यांनाही जियाला चांगल्या डॉक्टरांकडे नेण्यास सांगितले होते. तिच्यावर उपचार करा पण त्यांनी ते ऐकले नाही. त्या फक्त तिच्यावर काम करण्यासाठी दबाव टाकत होत्या. जेव्हा त्यांना आर्थिक मदतीची गरज होती तेव्हाचे ते जियाला जवळ करायचे, असा गंभीर आरोप सूरजने जियाच्या आईवर केला आहे.

हेही वाचा- अलका याज्ञिक यांनी आमिर खानला खोलीमधून दिलेलं हाकलून, कारण…

‘निशब्द’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जिया खान दिसली होती. अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच तिने आत्महत्या करून जीवन संपवलं. ३ जून २०१३ रोजी मुंबईतील अपार्टमेंटमध्ये ती मृतावस्थेत आढळली होती. जियाची आई राबिया खान यांनी सूरजने मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप केला होता. आता सूरजची निर्दोष मुक्तता झाल्यानंतरी राबियांनी आपला लढा सुरू राहील, असं म्हटलं आहे.