जिया खान आत्महत्या प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. २०१३ पासून जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सूरज पांचोलीवर खटला सुरू होता. १० वर्षांनंतर सूरज पांचोलीला या प्रकरणातून दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरजच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक जण त्यांचे अभिनंदन करत आहेत. या प्रकरणातून सुटका होताच सूरज पांचोलीने सर्वप्रथम सलमान खानला मेसेज केला होता.

हेही वाचा- “तिला कुटुंबाची गरज होती पण..”; सूरज पांचोलीने जिया खानच्या आईवर केले गंभीर आरोप

Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू
sucide pod controversy
सुसाईड पॉडमध्ये महिलेचा रहस्यमयी मृत्यू? मृत्यूचे कारण आत्महत्या की हत्या? यावरून सुरू झालेला नवा वाद काय?
father held for molesting 14 year old girl in nagpur
जन्मदात्याकडून किळसवाणा प्रकार

बॉम्बे टाइम्सशी बोलताना सूरज पांचोलीने सलमानने त्याच्या वाईट काळात त्याला कशी मदत केली याबद्दल सांगितले. सूरज म्हणाला, ‘सलमान खान माझ्या वडिलांचा किंवा आईचा मित्र नाही. अर्थात, ते सर्व एकाच क्षेत्रात काम करत असल्याने ते एकमेकांना ओळखतात. मी एक था टायगरचा एडी होतो आणि त्याने मला सांगितले की तो माझा पहिला चित्रपट तयार करणार आहे. २०१३ मध्ये माझ्यावर आरोप लावण्यात आला होता. तरीही त्याने माझ्यासाठी हिरो चित्रपटाची निर्मिती केली. सलमान नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिला. त्याने माझ्यासाठी इतरांपेक्षा जास्त केले आहे. परंतु मला माझ्या मर्यादा माहित आहेत आणि मी त्या नात्याचा फायदा घेणार नाही. मी त्यांना शंभर वेळा भेटलो, पण कामाच्या संदर्भात कधीच भेटलो नाही. कोर्टातून बाहेर पडताच मी त्याला पहिला मेसेज केला. सलमान म्हणाला, ‘सूरज, तू काहीही चुकीचे केलेले नाही हे तुला माहीत असेल तर तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही.’ असे सूरज म्हणाला.

हेही वाचा- Video : श्रीनगरमध्ये शाहरुख खानला चाहत्यांनी घेरलं; गर्दी बघून अभिनेत्याची झाली होती ‘अशी’ अवस्था

यावेळी सूरज पांचोली सांगितले की, या दहा वर्षात त्याने अनेक लोकांकडून काम मागितले, मात्र या प्रकरणामुळे कोणीही त्यांना काम दिले नाही. ‘गेल्या १० वर्षांत मी कामासाठी सर्वांचे दरवाजे ठोठावले. ज्याला देशाबाहेर जाण्याची परवानगी नाही आणि डोक्यावर टांगती तलवार आहे अशा व्यक्तीसोबत कॉर्पोरेट्स आणि स्टुडिओला काम करायचे नव्हते. मला आधी क्लीन चिट मिळावी अशी त्यांची इच्छा होती. निर्दोष मुक्तता झाल्यानंतर मला आता पुनर्जन्म झाल्याचे वाटते आणि मी काम करण्यास तयार असल्याचेही सूरजने स्पष्ट केले.