२८ एप्रिल रोजी सूरज पांचोलीला सीबीआय न्यायालयाने जिया खान प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. त्याच्यावर अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. ‘निशब्द’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जिया खान दिसली होती. अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच तिने आत्महत्या करून जीवन संपवलं. ३ जून २०१३ रोजी मुंबईतील अपार्टमेंटमध्ये ती मृतावस्थेत आढळली होती. जियाची आई राबिया खान यांनी सूरजने मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप केला होता. आता सूरजची निर्दोष मुक्तता झाल्यानंतरी राबियांनी आपला लढा सुरू राहील, असं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “तुझं आयुष्य फक्त पार्टी आणि मुली…’, जिया खानने सुसाईड नोटमध्ये सूरज पांचोलीबद्दल केलेले खुलासे; म्हणालेली, “मला गरोदर…”

राबिया खान म्हणाल्या, “मी लढेन आणि जियाला न्याय मिळवून देईन. जियाला न्याय मिळेल अशी मला आशा आहे. मी सर्व पुराव्यासह न्यायालयात जाणार आहे. मी उच्च न्यायालयात जाईन, मी सर्वोच्च न्यायालयात जाईन, काहीही झाले तरी चालेल. मी दहा वर्षांपासून वाट पाहत आहे, कदाचित त्यांना मी अधिक मेहनत करावी असं वाटतंय, त्यामुळे मी आणखी मेहनत करीन.”

Video: “माझ्या मुलीचा मृत्यू कसा झाला?” सूरज पांचोलीच्या निर्दोष मुक्ततेनंतर जिया खानच्या आईचा सवाल; म्हणाल्या, “मी कोर्टाच्या…”

दुसरीकडे, या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज पांचोलीची आई जरीना वहाब यांनी देवाचे आभार मानले. जरीना म्हणाल्या, “१० वर्षे हा खूप मोठा काळ होता. पण, कोर्टाच्या निर्णयाने आम्हाला दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात मला देवावर विश्वास होता.” दरम्यान, जरीना यांनी राबिया खान यांच्या लढा कायम ठेवण्याच्या वक्तव्यावरही उत्तर दिलं आहे.

गर्भवती जिया खानला बॉयफ्रेंड सूरज पांचोलीने दिलेल्या गर्भपाताच्या गोळ्या? सुसाईड नोटमध्ये म्हणाली होती, “तुझ्या प्रेमात…”

“मी तिल्ला अल्लाहच्या भरोशावर सोडलं आहे. मला तिला काहीच म्हणायचं नाही. देव नेहमी न्याय करतो, यावेळी त्याने तेच केले. जर तिला लढाई चालू ठेवायची असेल तर तिला करू द्या. सत्य काय आहे हे तिलाही माहीत आहे. हे माहीत असूनही ती जर लढा सुरू ठेवणार असेल, तर तिला करू द्या, मला याबद्दल काहीच म्हणायचं नाही,” असं जरीना वहाब म्हणाल्या.

जरीना पुढे म्हणाल्या, “आम्ही कधीही मदतीची भिक मागितली नाही. आम्ही कुणासमोर हात पसरले नाहीत. आम्ही फक्त देवाकडे प्रार्थना करायचो. बराच वेळ गेला, पण अखेर माझ्या मुलाला न्याय मिळाला. १० वर्षांत अनेक गोष्टी घडल्या. जे व्हायला नको होतं ते घडलं. पण त्याला आपण काहीच करू शकत नाही, जे घडलं ते आपण बदलू शकत नाही. १० वर्षे उलटून गेली आहेत पण असं वाटतं की ती कालचीच गोष्ट आहे.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sooraj pancholi mother zarina wahab reply to jiah khan mother rabia khan on she will fight for justice hrc