अभिनेत्री जिया खानने १० वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याप्रकरणी तिचा बॉयफ्रेंड सूरज पंचोलीवर तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे आरोप करण्यात आले होते. या सर्व आरोपांमधून काही महिन्यांपूर्वी सूरजची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. सूरज सध्या एका तरुणीला डेट करत आहे, त्याने स्वतःच याबाबत खुलासा केला आहे.
“कोणाच्या बापाची हिंमत नाही की…”, अक्षय कुमार स्पष्टच बोलला; म्हणाला, “सगळे मला…”
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सूरज पांचोलीने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही गोष्टी शेअर केल्या. तसेच त्याने सध्या एका समजूतदार तरुणीबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं नमूद केलं. यावेळी त्याने तिचं नाव किंवा ओळख सांगितली नाही. मुलाखतीत सूरजला ‘अलीबाबा’ फेम अभिनेता शिझान खानबद्दल विचारण्यात आलं. शिझानला डिसेंबर २०२२ मध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि शोमधील सह-कलाकार तुनिषा शर्माच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
विचारल्यावर सूरज म्हणाला की अशा प्रकारची मीडिया ट्रायल एखाद्याला प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. तो म्हणाला, “माझा प्रेमावर विश्वास आहे. मीही तिच्यानंतर (जिया खान) पुन्हा प्रेमात पडलो.” मुलाखतीत अभिनेत्याला विचारण्यात आले की तो गेल्या सात वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे का? यावर सूरज म्हणाला, “इतके दिवस नाही, पण मी रिलेशनशिपमध्ये आहे. आम्ही आमच्या भूतकाळाबद्दल कधीच बोललो नाही. तशी गरज पडली नाही.”