जिया खानच्या आत्महत्या प्रकरणात सूरज पंचोलीची निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर सूरज पांचोली बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून येऊ शकतो, अशी जोरदार चर्चा झाली. या चर्चेचं कारण त्याची शोचा होस्ट सलमान खानशी असलेली जवळीक होती. पण, आपण बिग बॉसमध्ये सहभागी होणार नसल्याचं सूरजने स्पष्ट केलं आहे. तसेच तो कधीही रिअॅलिटी शो करणार नाही, असंही त्याने म्हटलं आहे.

‘नीयत’ व ‘७२ हूरें’ दोन्ही ठरले फ्लॉप, रविवारीही प्रेक्षकांनी चित्रपटांकडे फिरवली पाठ, कमाईचे आकडे निराशाजनक

“मी कधीच रिअॅलिटी शो करणार नाही. त्यांनी (बिग बॉसच्या निर्मात्यांनी) माझ्याशी संपर्क साधला नाही. या शोचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे, हे मला माहीत असूनही मी तो करणार नाही,” असे त्याने ‘बॉम्बे टाइम्स’ला सांगितले. “मला आता अभिनय, चित्रपट आणि वेब शोवर देखील लक्ष केंद्रित करायचे आहे. माझ्या प्रवासावरील निर्बंधांमुळे आणि जिया खान प्रकरणामुळे माझ्या डोक्यावर टांगती तलवार होती, त्यामुळे मी पूर्वी कामाच्या खूप संधी गमावल्या होत्या,” असंही सूरज म्हणाला.

पत्नी डॉक्टर असल्याचा फायदा झाला का? दत्तू मोरे म्हणाला “काहीही झालं तरी…”

रिअॅलिटी शोमध्ये सहभागी व्हायचं नसलं तरी सूरज पांचोली जिया खान प्रकरणावर आधारित डॉक्युमेंटरीचा भाग बनण्यास इच्छुक आहे. ज्यामध्ये तो त्याची बाजू सर्वांसमोर मांडू शकेल. “जर जिया खान प्रकरणावर डॉक्युमेंटरी बनवली गेली तर मला त्याचा भाग व्हायला आवडेल, कारण त्या माध्यमातून मी अशा गोष्टी सांगू शकेन, ज्या अद्याप सांगितल्या गेल्या नाहीत,” असं सूरजने म्हटलंय.

सूरज आदित्य पांचोली आणि झरिना वहाब यांचा मुलगा आहे. जिया खानने जून २०१३ मध्ये आत्महत्या केली होती, तिने सहा पानांची सुसाइड नोट लिहिली होती, ज्यामुळे तिने फसवणूक, शारिरीक शोषण व गर्भपाताचे आरोप सूरजवर केले होते. तब्बल १० वर्षांनी या एप्रिल महिन्यात सूरजची जिया खान आत्महत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली होती.

Story img Loader