ज्यांनी ज्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम चित्रपट पाहिला आहे, त्यांना त्या चित्रपटात त्यांच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नक्कीच आठवत असेल. त्या दिवंगत अभिनेत्रीचं नाव सौंदर्या रघु आहे. आज सौंदर्याची पुण्यतिथी आहे. तिच्या निधनाला आज १९ वर्षे झाली. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सौंदर्याचं १७ एप्रिल २००४ रोजी अपघाती निधन झालं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गर्भवती पत्नीला भर कार्यक्रमात ओढत नेल्याने ट्रोल, सना खानचा पती मुफ्ती अनस आहे तरी कोण?

सौंदर्याचा जन्म १८ जुलै १९७२ रोजी कर्नाटकमधील कोलार इथं झाला होते. तिचे वडील एस सत्यनारायण हे चित्रपट क्षेत्रात काम करायचे. घरातील फिल्मी वातावरणामुळे सौंदर्याला लहान वयातच अभिनयाची आवड निर्माण झाली. मात्र, अभिनयाची ओढ असूनही तिने अभ्यास पूर्ण केला. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात असताना तिला चित्रपटाची ऑफर मिळाली आणि तिने शिक्षण अर्धवट सोडलं. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटाचे नाव ‘गंधर्व’ होते. या चित्रपटानंतर ती रातोरात स्टार बनली आणि तिला अनेक मोठ्या ऑफर्स मिळू लागल्या.

Video: भर कार्यक्रमात गर्भवती सना खानला पतीने दिलेली वागणूक पाहून नेटकऱ्यांचा संताप, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्पष्टीकरण देत म्हणाली…

सौंदर्याने तिच्या करिअरमध्ये अनेक भाषांमध्ये काम केले, पण तिने सर्वाधिक तेलुगू चित्रपट केले. या अभिनेत्रीने जवळपास १०० चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू चालवली. तिने कमल हासन आणि रजनीकांत यांसारख्या सुपरस्टार्सबरोबर काम केले. मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर तिने ‘सूर्यवंशम’ चित्रपटात अभिनय केला होता.

चार वर्षांत मोडला प्रेमविवाह, तीन सुप्रसिद्ध अभिनेत्रींशी अफेअर अन्…; आता ‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय सिद्धार्थ

२००४ मध्ये सौंदर्याने राजकारणातही पाऊल ठेवले. लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपा आणि टीडीपी नेत्यांच्या प्रचारासाठी १७ एप्रिल रोजी बंगळुरूहून आंध्र प्रदेशातील करीमनगर इथं जाण्यासाठी उड्डाण केले होते, परंतु १०० फूट उंचीवर पोहोचताच तिचं विमान कोसळलं. या अपघातात सौंदर्या, तिचा लहान भाऊ तसेच तेलुगू चित्रपट निर्माते अमरनाथ, भाजपचे युवा नेते रमेश कदम यांचं निधन झालं होतं. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एका ज्योतिषाने सौंदर्याच्या आकस्मिक निधनाची भविष्यवाणी तिच्या बालपणातच केली होती. यानंतर अभिनेत्रीच्या वडिलांनी अनेकवेळा तिची पूजा करून घेतली, पण तिचा अपघातीच मृत्यू झाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soundarya death anniversary know about education movies of sooryavansham actress hrc