भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवला जाणार, अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. सौरव गांगुलीने बायोपिकच्या स्क्रिप्टला मंजुरी दिल्याने लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. बायोपिकची घोषणा झाल्यावर सुरुवातीला अभिनेता रणबीर कपूर हा सौरव गांगुलीची भूमिका साकारणार होता, परंतु आता काही कारणास्तव चित्रपटात रणबीरऐवजी आयुष्मान खुरानाची वर्णी लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या कमाईत घसरण; २५ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमावले फक्त ‘इतके’ कोटी

चित्रपटाचे निर्माते सध्या आयुष्मान खुरानाबरोबर याबाबत चर्चा करीत असल्याची माहिती ‘ई टाइम्स’ने दिली आहे. सौरव गांगुलीने चित्रपटाच्या निर्मात्यांना आयुष्मान खुरानाला मोठ्या पडद्यावर त्याची भूमिका साकारण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला असून दोघेही या संदर्भात लवकरच भेट घेणार आहेत.

हेही वाचा : विकी कौशलच्या पत्नीच्या भूमिकेसाठी कतरिनाची निवड का केली नाही? ‘जरा हटके जरा बचके’चे दिग्दर्शक म्हणाले, “तिचे व्यक्तिमत्त्व…”

सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या रजनीकांत ही, सौरभ गांगुलीच्या बायोपिकसाठी दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. लवकरच या चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. रणबीर कपूरने त्याच्या व्यस्त शेड्युलमुळे चित्रपटासाठी नकार कळवल्याने आता निर्मात्यांनी रणबीरऐवजी आयुष्मानची निवड केली आहे.

हेही वाचा : “तुझ्या लग्नाला बोलावले नव्हतेस…” करण जोहरच्या प्रश्नाला प्रियांका चोप्राने दिले होते सडेतोड उत्तर; ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल

सौरव गांगुली एक यशस्वी कर्णधार आणि त्यासोबतच तो चांगला फलंदाज म्हणूनही ओळखला जातो. सौरव गांगुलीने आपल्या कारकिर्दीत १८ हजारांहून अधिक धावा केल्या. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३८ शतके आणि १०७ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारांत त्याची फलंदाजीची सरासरी ४१+ आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत १३२ विकेट्सही घेतल्या आहेत. त्यामुळेच सौरव गांगुलीचे चाहते त्याचा बायोपिक मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sourav ganguly biopic this bollywood actor to play his role in movie sva 00