‘बडे मियाँ छोटे मियाँ’ डेव्हिड धवन यांचा हा चित्रपट १९९८ साली प्रदर्शित झाला होता. आता याच सुपरहिट चित्रपटाचा रिमेक करण्याची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली. बडे मियाँ छोटे मियाँ रिमेकमध्ये टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता पृथ्वीराज सुकुमारन यांनी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटात एन्ट्री केली आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. म्हणजेच ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये हिरो टायगर-अक्षय आणि खलनायक पृथ्वीराज सुकुमारन यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. पृथ्वीराज सुकुमारन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला आघाडीचा अभिनेता आहे. त्याने अय्या, औरंगजेब या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

“मला प्रीमियरला…” ‘दृश्यम २’ चित्रपटातील मराठमोळ्या अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

या चित्रपटात अभिनेत्री म्हणून श्रद्धा कपूर झळकणार अशी चर्चा आहे. इंडिया टुडेला मिळालेल्या माहितीनुसार ‘श्रद्धा कपूर’ ही अभिनेत्री टायगर श्रॉफ बरोबर झळकणार अशी चर्चा आहे. निर्मात्यांची देखील पहिली पसंती श्रद्धा कपूरच आहे.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहे, ज्याने यापूर्वी ‘टायगर जिंदा है’सारखे चित्रपट दिले आहेत. हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर असेल जो हिंदीसह तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल. हा चित्रपट पुढीच्यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South actor prithviraj sukumaran join cast of akshay kumar and tiger shroff upcoming action drama bade miyan chote miyan spg