बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगण सध्या चर्चेत आहे, त्याचा ‘थँक गॉड’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘थँक गॉड’मध्ये तो चित्रगुप्ताची भूमिका साकारताना दिसत आहे. या चित्रपटात अजय देवगणसह सिद्धार्थ मल्होत्रा आणि राकुल प्रीतची महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. २५ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप अपेक्षा होत्या परंतु गेल्या तीन दिवसात फारशी चांगली कमाई करू शकला नाही.

‘थँक गॉड’नंतर अजय देवगणचा ‘दृश्यम २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. २०१४ साली आलेल्या ‘दृश्यम’ चित्रपटाचा पुढील भाग असणार आहे. तसेच अजय देवगण पुन्हा एडका दिग्दर्शनाकडे वळला आहे. अजय देवगण भोला हा चित्रपट दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटात अभिनेत्री तब्बूदेखील आहे. या चित्रपटात ती पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.

marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
Ya goshtila Navach Nahi , cinema , pune ,
चंदेरी पडदा आणि गडद काळा अंधार
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”

“… म्हणून मी लष्करात गेलो नाही”, शाहरुख खानचा खुलासा

याच चित्रपटात आता एक दाक्षिणात्य अभिनेत्री दिसणार आहे. पिंकव्हिलाच्या माहितीनुसार अभिनेत्री अमला पॉल या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजयच्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात ती चित्रपटाच्या चित्रीकरणात सामील होईल. अमला पॉलने प्रामुख्याने तामिळ, मल्याळम आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.

या चित्रपटाच्या बाबतीत मागे तब्बूने एक फोटो शेअर केला होता. फोटोत अजय आकाशाकडे बोटे दाखवत तब्बूला काहीतरी दाखवत आहे आणि ते बघताना तब्बूच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे असा तो फोटो होता. या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत. अजय आणि तब्बूचा हा ९ वा एकत्र चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी ‘विजयपथ’, ‘हकीकत’, ‘तक्षक’, ‘दृश्यम’, ‘गोलमाल अगेन’, ‘दे दे प्यार दे’, ‘फितूर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आता दोघे ‘भोला’मध्ये एकत्र दिसणार आहेत.

Story img Loader