संजय लीला भन्साळी हे बॉलीवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या ‘बाजीराव मस्तानी’, ‘रामलीला’, ‘हम दिले दे चुके सनम’, ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. लवकरच संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित ‘बैजु बावरा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेली अनेक महिने भन्साळी ‘बैजु बावरा’ची स्टारकास्ट निश्चित करत आहेत. काही मीडिया रिपोर्टनुसार हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
बॉलीवूडची सुपरहिट जोडी रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असतील अशा चर्चा सध्या सुरू आहेत. याशिवाय दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारादेखील या चित्रपटाचा एक भाग असणार आहे.
हेही वाचा : ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलला काय झालं? हॉस्पिटलमध्ये झाली दाखल, सोशल मीडियावर लाइव्ह येऊन म्हणाली…
नयनाताराने शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये अभिनेत्रीने नर्मदा पै या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार नयनातारा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आगामी ‘बैजू बावरा’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारण्याची शक्यता आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नयनतारा पहिल्यांदाच रणवीर-आलियासह ऑनस्क्रीन काम करणार आहे.
नयनाताराने अद्याप अधिकृतरित्या हा चित्रपट स्वीकारलेला नाही. मार्च २०२३ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या कार्यालयाबाहेर नयनताराचा पती विग्नेश शिवनला पाहण्यात आलं होतं. तेव्हापासून अभिनेत्रीची ‘बैजू बावरा’मध्ये वर्णी लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
हेही वाचा : ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलला काय झालं? हॉस्पिटलमध्ये झाली दाखल, सोशल मीडियावर लाइव्ह येऊन म्हणाली…
‘बैजू बावरा’ चित्रपटाची कथा ऐतिहासिक महाकाव्यावर आधारित असून यामध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांची जोडी मुख्य भूमिका साकारणार असल्याची शक्यता आहे. यापूर्वी रणवीर-आलियाच्या जोडीने ‘गली बॉय’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.