अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपली छाप निर्माण करताना बॉलिवूडमध्येही स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. तिने हिंदी चित्रपटांमध्ये जरी काम केलं नसलं तरी बॉलिवूड चित्रपट पाहणारे असंख्य प्रेक्षक तिचे चाहते आहेत. तिचे नाव आज भारतातल्या आघाडीनकीय अभिनेत्रींच्या यादीत घेतले जाते. पण आता तिने एक वेगळी ऊंची गाठली आहे. समांथा हिने एका बाबतीत दीपिका पदुकोण आणि आलिया भट्टलाही मागे सोडले आहे.

समंथा रुथ प्रभूबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे, जी ऐकून तिचे चाहते खूश झाले आहेत. सामंथा रुथ प्रभू हिला भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रीचा किताब मिळाला आहे. सामंथा रुथ प्रभूने या यादीत अव्वल स्थान पटकावले असून तिने बॉलिवूडच्या आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोणला मागे टाकले आहे. Ormax Stars India Loves ने नुकतीच भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे. या यादीत जवळपास १० अभिनेत्रींची नावे जाहीर करण्यात आली असून या यादीत सामंथा रुथ प्रभूने पहिले स्थान पटकावले आहे.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा

आणखी वाचा : ओटीटीवर महिलांचं योग्य चित्रण केलं जातं का? दिग्दर्शक मधुर भांडारकर म्हणतात…

या यादीत समांथा पाठोपाठ बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट दुसऱ्या क्रमांकावर, साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा तिसऱ्या क्रमांकावर, काजल अग्रवाल चौथ्या क्रमांकावर, दीपिका पदुकोण पाचव्या, रश्मिका मंदान्ना सहाव्या, कतरिना कैफ सातव्या, अनुष्का शेट्टी आठव्या क्रमांकावर आहे. नवव्या क्रमांकावर क्रिती सुरेश आणि दहाव्या क्रमांकावर त्रिशा कृष्णन या अभिनेत्री आहेत. ओरमॅक्स स्टार्स इंडिया लव्हजने जाहीर केलेल्या या यादीत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री चमकत आहेत.

हेही वाचा :

हेही वाचा : समांथा रुथ प्रभूला झालाय गंभीर आजार, रुग्णालयातील फोटो शेअर करत म्हणाली…

पहिल्या क्रमांकानंतर तिसऱ्या क्रमांकावर दाक्षिणात्य अभिनेत्रीचे नाव आले आहे. त्याचबरोबर बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य अभिनेत्रींचा दबदबा कायम आहे. ही बातमी समजल्यानंतर समांथाचे चाहते खूप खुश झाले असून सर्वजण तिचं कौतुक आणि अभिनंदन करत आहेत. दरम्यान समांथा रुथ प्रभूचा ‘यशोदा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील समांथाचा अभिनय प्रेक्षकांची मने जिंकत आहे. आज ती करोडो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

Story img Loader