प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. गेले काही महिने अभिनेत्री मायोसिटिस या आजारावर उपचार घेत आहे. त्यामुळे मध्यंतरी अभिनेत्रीने कलाविश्वापासून छोटासा ब्रेक घेतल्याचं जाहीर केलं. नुकताच तिचा ‘खुशी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. परंतु, या चित्रपटाचं शूटिंग समांथाने मनोरंजनविश्वातून ब्रेक घेण्यापूर्वी पूर्ण केलं होतं.

आजारपणासाठी घेतलेल्या ब्रेकनंतर समांथा बॉलीवूड अभिनेता वरुण धवनसह ‘सिटाडेल इंडिया’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. एवढंच नव्हेतर ती बॉलीवूडचा भाईजान सलमान खानबरोबर काम करणार असल्याच्या चर्चा अलीकडे सुरु झाल्या आहेत. याबाबत समांथाने इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनवर खुलासा केला आहे.

rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Stree 2 Actor Mushtaq Khan Kidnapping
१२ तास डांबून ठेवलं अन्…; ‘स्त्री २’ फेम बॉलीवूड अभिनेत्याचं अपहरण! कशी झाली सुटका? सांगितला संपूर्ण घटनाक्रम
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांच्यासमोर हात जोडले, पाया पडला अन्…; ७ कोटींच्या प्रश्नाआधी भावुक झाला स्पर्धक, पाहा व्हिडीओ

समांथा तिच्या इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये म्हणाली, “भविष्यातील कोणत्याही प्रोजेक्टसाठी मी अद्याप काहीच योजना बनवलेली नाहीत. यापुढे प्रत्येक प्रोजेक्टची निवड मी अगदी विचार करून करणार आहे. ज्या भूमिका मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढतील त्या मला नक्कीच करायला आवडतील. जोपर्यंत मला अशा प्रकारची भूमिका मिळत नाही तोपर्यंत मला वाटते की मी जे करतेय ठीक आहे. सध्या तरी माझ्या कोणत्याच योजना नाहीत.”

हेही वाचा : “गेल्यावर्षी १०० कोटींचा प्रोजेक्ट सोडला, कारण…”, अभिनेता गोविंदाने केला खुलासा; म्हणाला, “स्वत:च्या कानाखाली मारून…”

समांथाच्या लाइव्ह सेशनची लहानशी क्लिप तिच्या चाहत्याने ट्विटरवर शेअर केली आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या आगामी चित्रपटात समांथा आणि सलमान खान एकत्र काम करणार असल्याच्या अफवा मध्यंतरी पसरल्या होत्या. समांथाने लाइव्ह सेशनमध्ये असा कोणताही प्रोजेक्ट सुरु नसल्याचं सांगून या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

हेही वाचा : लोकप्रिय हिंदी मालिकेच्या सेटवर दुर्दैवी घटना; लाइटमनचा विजेच्या झटक्याने मृत्यू

दरम्यान, आजापणातून सावरत असलेली समांथा नुकतीच विजय देवरकोंडाबरोबरच्या खुशी चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता लवकरच अभिनेत्री वरूण धवनसह ‘सिटाडेल’ सीरिजमध्ये काम करणार आहे. अभिनेत्रीच्या या वेबसीरिजकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा आहेत.

Story img Loader