काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवरील रणबीरचा लूक चांगलाच व्हायरल झाला होता, आता त्याच्या याच नवीन चित्रपटाचे अधिकृत पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. ‘अर्जुन रेड्डी’, ‘कबीर सिंग’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे संदीप वांगा रेड्डी यांच्या आगामी ‘ॲनिमल’ या चित्रपटात रणबीर कपूर झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पोस्टरमध्ये रणबीर पांढऱ्या कपड्यात दिसत आहे, आणि त्याचा पांढरा शर्ट पूर्णपणे रक्ताने माखला आहे, हातावर जखम आहे, शिवाय त्याच्या काखेत एक कुऱ्हाड दिसत आहे जी रक्ताने माखलेली आहे. वाढलेली दाढी आणि केस, रक्ताने माखलेले हात अशा डॅशिंग अवतारातही रणबीर पोस्टरवर सिगारेट शिलगवताना दिसत आहे.

आणखी वाचा : आत्महत्येचे विचार जेव्हा मनात येतात; अमित साधनं सांगितला त्याचा अनुभव

रणबीरचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात होते. त्याचा हा लूक प्रेक्षकांना चांगलाच पसंत पडला आहे. मनोरंजनसृष्टीतील इतर कलाकारांनीही रणबीरचं कौतुक केलं आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासनेही या पोस्टरचं कौतुक केलं आहे. प्रभासला हे पोस्टर चांगलंच पसंत पडलं असून त्याने ते त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे.

prabhas post

पोस्टर शेअर करताना त्याने दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच रणबीर कपूरचा उल्लेख त्याने सुपरस्टार म्हणून केला आहे, शिवाय तो या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक असल्याचं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. शिवाय अभिनेत्री रश्मिका मंदानालासुद्धा त्याने टॅग करत शुभेच्छा दिल्या आहेत.या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदाना, परिणीती चोप्रा, बॉबी देओल, सौरभ शूक्लासारखे कलाकार पाहायला मिळणार आहेत. ११ ऑगस्ट २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South indian star prabhas praises first look and poster of ranbir kapoor upcoming film animal avn