दाक्षिणात्य अभिनेता प्रभास त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. रिलीज झाल्यापासून प्रेक्षकवर्गाकडून या चित्रपटावर टीका करण्यात येत आहे. चित्रपटातील संवादांपासून ते कलाकारांच्या लुकपर्यंत सोशल मीडियावर ‘आदिपुरुष’मुळे अनेक वाद निर्माण झाले आहेत. आदिपुरुषच्या वादादरम्यान अभिनेता प्रभासच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
दिग्दर्शक नाग अश्विन चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत असून ‘प्रोजेक्ट के’मध्ये चांगले ग्राफिक्स वापरण्यात येणार आहेत. ‘प्रोजेक्ट के’चे जवळपास ७० टक्के शूटिंग पूर्ण झालेले आहे. या चित्रपटाचे बजेट खूप जास्त असून हा एक सायन्स फिक्शन चित्रपट असेल, यामध्ये प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, दिशा पटनी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारतील. या तगड्या स्टारकास्टबरोबर या चित्रपटात आता अभिनेते कमल हासन यांची एन्ट्री झाली आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार कमल हासन या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. यासंदर्भात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करीत माहिती दिली आहे.
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी कमल हासन यांची ‘प्रोजेक्ट के’ मध्ये एन्ट्री झाल्याची माहिती इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून दिली आहे. ते लिहितात, “कमल तुझे खूप खूप स्वागत…तुझ्याबरोबर पुन्हा काम करायला नक्की आवडेल!” अभिनेते कमल हासन यांनी या चित्रपटासाठी तब्बल १५० कोटी रुपये मानधन आकारल्याची सध्या चर्चा आहे.
‘प्रोजेक्ट के’चे संपूर्ण बजेट जवळपास ५०० कोटींच्या घरात आहे. चित्रपटाची निर्मिती वैजयंती मुव्हीज करत असून याचे संगीतकार संतोष नारायण आहेत. आता चित्रपटात कमल हासन यांच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.