७ फेब्रुवारी २०२३ रोजी बॉलिवूडचं आणखी एक जोडपं लग्नबंधनात अडकलं. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची गेले बरेच महीने चर्चा सुरू होती. नुकतेच त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. दिवसभर चाहते त्यांच्या या फोटोजची वाट बघत होते. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये अतिशय गुप्तता पाळून या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला.
या लग्नसोहळ्यात बऱ्याच सेलिब्रिटीजनी हजेरी लावली. २ दिवस आधीपासूनच करण जोहर, शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर यांचे एयरपोर्टवरचे फोटोज व्हायरल झाले. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीतच हा सोहळा संपन्न झाला. दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणलासुद्धा या लग्नसोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं.
आणखी वाचा : अवघ्या ३० रुपयांत पार पडला गझल सम्राट जगजीत सिंग व चित्रा यांचा विवाहसोहळा; एक अविस्मरणीय सुरेल लव्ह स्टोरी
‘आरआरआर’सारखा सुपरहीट चित्रपत दिल्यानंतर राम चरण आता लवकरच दिग्दर्शक शंकर यांच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे . अजून या चित्रपटाचं नाव ठरलेलं नाही, पण राम चरणबरोबर या चित्रपटात कियारा अडवाणीसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे, म्हणूनच कियारा आणि सिद्धार्थने राम चरण अन् त्याच्या कुटुंबालादेखील लग्नासाठी निमंत्रण दिलं होतं, पण राम चरणला काही कारणास्तव या सोहळ्याला उपस्थित राहता आलेलं नाही.
राम चरणची पत्नी उपासना कोनीदेला हिने कियाराच्या नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटो खाली कॉमेंट करत याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. उपासना कॉमेंटमध्ये म्हणाली, “तुमचं मनापासून अभिनंद, फारच सुरेख. आम्हाला तिथे यायला जमलं नाही त्याबद्दल माफी मागते. तुम्हा दोघांना भरपूर प्रेम आणि शुभेच्छा.” राम चरणच्या या चित्रपटात कियारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच कियारा कार्तिक आर्यनबरोबर ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटातही झळकणार आहे. लवकरच सिद्धार्थ आणि कियारा मुंबई आणि दिल्लीमध्ये एक रीसेप्शन आयोजित करणार आहेत.