मजहब बेनाम हो जाए
तो सुकून मिलें…
हर खुदा में खुदा हर में है
ये बात आम हो जाए
तो सुकून मिले
नजर का उठना, कुछ कहना
लाजीम है.. हर नजर पाक हो जाए
तो सुकून मिलें..
चांद, तारे, सुरज आसमाँ सबके सांझे हैं
इन्सान भी इन्सान का हो जाए
तो सुकून मिलें..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ही कविता आहे संवेदनशील कलावंत पंकज कपूर यांची. पंकज कपूर म्हटलं की डोळ्यांसमोर त्यांनी साकारलेल्या विविध भूमिका उभ्या राहतात. त्यातल्या अजरामरही अनेक आहेत. मात्र एक भूमिका अशी आहे ज्या भूमिकेचं नातं पंकज कपूर यांच्याशी अतूट आहे. स्वतः पंकज कपूर यांनाही ते मान्य असेलच. ही भूमिका आहे ‘करमचंद.’ दूरदर्शन ऐन भरात होतं तेव्हा ही मालिका लागत असे. गाजर खात रहस्यांची उकल करणारा हा गुप्तहेर सगळ्यांना आवडला होता आणि तितकाच तो स्मरणातही राहिला आहे. या ‘करमचंद’ची आज सत्तरी आहे. पंकज कपूर यांचा आज ७० वा वाढदिवस. शाहिद कपूरचे वडील अशीही त्यांची ओळख आता झाली आहे. मात्र मालिका, चित्रपट यांतून पंकज कपूर हे कायमच आपल्या अभिनयाचं बावनकशी सोनं प्रेक्षकांना वाटत राहिले आहेत.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये गिरवले अभिनयाचे धडे

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अल्काझींच्या तालमीत अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर पंकज कपूर यांनी मालिका आणि सिनेविश्वात पाऊल ठेवलं. त्याआधी त्यांनी इंजिनिअरींगही केलं. पण वेगळं काहीतरी करुन दाखवावं ही गोष्ट मनात होती आणि त्याच एका इच्छेतून ते अभिनयाकडे वळले. शाळेच्या दिवसांपासूनच पंकज कपूर नाटकांमध्ये काम करत असत. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून बाहेर पडल्यानंतर ते चित्रपटांकडे वळले. सिनेमातली कोणतीही भूमिका आपल्याचसाठी लिहिली आहे हे समजून ते भूमिकेत प्राण ओतत.

एक रुका हुआ फैसलातला ज्युरी क्रमांक ३

‘एक रुका हुआ फैसला’ हा इंग्रजी सिनेमा 12 अँग्री मेनचा रिमेक होता. १२ ज्युरी आणि एक आरोपी. ज्युरी क्रमांक ३ पंकज कपूर यांनी साकारला आहे. त्यात आरोपी हा खुनाचा आरोपी आहे की नाही हे ज्युरींना ठरवायचं असतं. यात पंकज कपूर यांनी आपल्या अभिनयाची खास गोष्ट दाखवून दिली. सतत तिसरटपणे वागणारा, कायम आरोपीच्या विरोधात बोलणारा, कुणीही बाजूने गेलं तरीही मी आरोपीची बाजू घेणार नाही, मुलं अशीच असतात ही ठाम समजूत असणारा ज्युरी संपूर्ण सिनेमाभर पंकज कपूर यांनी अत्यंत लीलया साकारला आहे. सिनेमाचा क्लायमॅक्स जवळ येतो तसं आपल्याला पंकज कपूर यांनी साकारलेल्या ज्युरीचं अंतरंग काय ते उलगडतं. त्यावेळी त्यांची दया येते, संपूर्ण सिनेमाभर ते असं का वागतात? हे एका क्षणात कळतं. एरवी प्रेक्षक म्हणून त्यांचा तिरस्कार करणारे आपण त्यांचा हा पैलू उलगडल्यावर त्यांना समजून घेतो. अभिनयातला हा बदल पंकज कपूर यांनी खुबीने साकारला आहे.

‘एक डॉक्टर की मौत’, ‘जाने भी दो यारो’ मधल्या भूमिका चर्चेत

‘एक डॉक्टर की मौत’ हा सिनेमाही तसाच. या सिनेमातला त्यांनी साकारलेला डॉ. दीपांकर कुष्ठरोगावरची लस शोधण्यासाठी आयुष्य खर्ची घालतो पण त्याच्या आयुष्यात काय होतं? त्या लसीचं त्याला श्रेय मिळतं की नाही? हे सगळं दाखवण्यात आलं आहे. यातलाही त्यांचा अभिनय खूप सुंदर होता. ‘जाने भी दो यारो’ या सिनेमात त्यांनी तनरेजा नावाचा एक भ्रष्ट बांधकाम व्यावसायिक साकारला होता. हा व्यावसायिक इतका अस्सल वाटतो की आज काल असे व्यावसायिक पाहिले की पंकज कपूर यांच्या तनरेजाची आठवण होते. कुंदन शाह यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. यातल्या सगळ्याच कलाकारांनी उत्तम भूमिका केल्या होत्या. एक प्रकारे उत्तम सिनेमाची भट्टीच जमली होती.

वैविध्यपूर्ण भूमिका साकारत मिळवलं यश

‘मंडी’, ‘मुसाफीर’, ‘आघात’, ‘जलवा’, ‘राख’ या चित्रपटांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिकांचीही चर्चा झाली. राखमधल्या इन्स्पेक्टर पी. के. साठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. १९८८ मध्ये ‘तमस’ या मालिकेतला ठेकेदारही त्यांनी साकारला. १९९२ मध्ये मणिरत्नमच्या रोजा या सिनेमात पंकज कपूर यांनी दहशतवादी साकारला होता ज्याचं नाव होतं लियाकत. ऋषी कुमार (अरविंद स्वामी) R.A.W. साठी काम करत असतो तेव्हा त्याचं अपहरण करण्यात येतं. ‘लियाकत’च्या (पंकज कपूर) ताब्यात ऋषी कुमार असतो. लियाकतच्या या भूमिकेत पंकज कपूर यांनी जान ओतली आहे. ‘भारत हम को जान से प्यारा है..’ हे गाणं आणि पंकज कपूर यांच्या चेहऱ्यावर असलेले भाव हे आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. या आणि अशा चित्रपटांमध्ये पंकज कपूर भूमिका करत राहिले. १९९० च्या दशकानंतर त्यांनी ऑफिस ऑफिस ही तुफान कॉमेडी मालिकाही केली.

‘मुसद्दीलाल’ही ‘करमचंद’ इतकाच पॉप्युलर

करमचंद या मालिकेचे संवाद, खास गाजर खाण्याची पद्धत, किटीला हाक मारण्याची पद्धत या सगळ्या लकबी पंकज कपूर यांनी जशा लोकांना आपल्या सहज अभिनयातून लक्षात ठेवायला लावल्या तशाच पद्धतीचं पात्र होतं मुसद्दीलाल. मुसद्दीलाल हा तर मला आर. के. लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’ सारखाही वाटतो. कारण सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करत तो वेगवेगळ्या समस्या घेऊन तो वेगवेगळ्या सरकारी ऑफिसमध्ये खेटे घालत असतो. त्या कार्यालयांमध्ये होणारी लाचखोरी, एक फाईल दुसऱ्या टेबलवर कशी जाते त्यासाठी किती जणांचे हात ओले करावे लागतात? या सगळ्यावर विनोदी अंगाने मार्मिक भाष्य करण्यात आलं होतं. चिमटे काढत भ्रष्टाचार कसा चालतो ते दाखवण्यात आलं होतं. या भूमिकेतही पंकज कपूर एकदम चपखल बसले. मुसद्दीलाल म्हटलं की पंकज कपूर यांचंच नाव समोर येतं.

मकबूलमधला ‘अब्बाजी’ही स्मरणात

२००३ मध्ये पंकज कपूर यांनी मकबूल सिनेमातला ‘अब्बाजी’ साकारला. हा सिनेमा शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’वरुन प्रेरित होता. विशाल भारद्वाजने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. प्रेयसीने सांगितलं म्हणून ‘मकबूल’ आपल्या वडिलांची अब्बाजींची हत्या करतो, त्यानंतर त्याला ती डॉनची गादी मिळते का? पुढे काय काय घडतं? हे सगळं सिनेमात उलगडतं. पण सिनेमाची जान आहे ती म्हणजे अब्बाजी अर्थातच पंकज कपूर. सिनेमात ते ज्या पद्धतीने वावरले आहेत आणि ज्या प्रकारे त्यांनी अभिनयाची छाप सोडली आहे त्याला जवाब नाही. या सिनेमात मकबूल (इरफान खान) बिर्याणी बनवतानाचा एक प्रसंग आहे. त्यात अब्बाजी म्हणतात, ”मेरे लख्ते जिगर जिस प्यारसे बिर्यानी बना रहाँ है जी करता है अपना गोश्तभी इसमे मिलाँदू!” हा डायलॉग म्हणताना त्यांचे हावभाव आणि आवाज जो काही लागला आहे त्याला तोड नाही नाही. या सिनेमात ओम पुरी आणि नसरुद्दीन शाह हे दोन कसलेले कलाकारही आहेत. मात्र लक्षात राहिला तो अब्बाजीच! खर्जातला आवाज, गँग चालवताना मुत्सदेगिरी करणारा डॉन त्यांनी तोडीने साकारला आहे.

सेहरमधला प्राध्यापकही सुंदर अभिनयाने सजलेला

पंकज कपूर यांच्या ‘सेहर’ या सिनेमाचा उल्लेखहा आवर्जून करावासा वाटतो. कारण या चित्रपटात त्यांनी एका प्राध्यापकाची भूमिका साकारली आहे. मोबाइलचा काळ नुकताच सुरु झालेला या सिनेमात दाखवण्यात आला आहे. तेव्हा मोबाइल बाबत माहिती नसणारा हा प्राध्यापक गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांना कशी मदत करतो हे पाहणं रंजक झालं आहे. पंकज कपूर यांना कविता लिहिण्याची आवड आहे. तसंच नुकतंच त्यांनी एक पुस्तकही लिहिलं आहे. मी विद्यार्थी दशेत फार ढ होतो असं सांगणाऱ्या या मनस्वी कलावंताचा अभ्यास करणं हे म्हणजे अभिनयात नव्याने येऊ पाहणाऱ्यांसाठी एखाद्या विद्यापीठासारखं आहे.

भूमिका कुठलीही असो त्यात अभिनयाचे रंग भरणं आणि ती भूमिका आपलीशी करुन घेत त्यात रंगून जाणं तसंच प्रेक्षकांनाही आपण तेच आहोत हे भासवणं. करमचंद असो, मुसद्दीलाल असो किंवा इतर भूमिका असोत पंकज कपूर यांनी ते आव्हान कायमच स्वीकारलं आहे आणि रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या करमचंदला विसरणं केवळ अशक्यच आहे. त्यांच्याच कवितेच्या ओळी नीट लक्षात घेतल्या तर.. ‘चांद, तारे, सुरज आसमाँ सबके सांझे हैं, इन्सान भी इन्सान का हो जाए तो सुकून मिलें..’हा ‘सुकून’ आता त्यांना नक्की मिळाला असेल यात शंका नाही.