निर्माते बोनी कपूर यांनी विचित्र परिस्थितीत अभिनेत्री श्रीदेवीला प्रपोज केलं होतं. कारण बोनी विवाहित होते व त्यांना अर्जुन व अंशुला ही दोन अपत्ये होती. बोनी यांनी प्रपोज केल्यावर श्रीदेवी त्यांच्याशी सहा महिने बोलल्या नव्हत्या; पण नंतर मात्र दोघांनी लग्न केलं आणि संसार केला. त्यांना दोन मुलीही झाल्या. एका मुलाखतीत आपली पहिली पत्नी मोना शौरीशी काहीच लपवलं नाही, असं बोनी यांनी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एबीपी लाइव्हला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मी तिच्या प्रेमात होतो, मी तिच्या प्रेमात आहे आणि मरेपर्यंत तिच्या प्रेमात राहीन. कारण तिचा होकार मिळवायला मला चार-पाच-सहा वर्षे लागली. मी तिला प्रपोज केल्यावर ती सहा महिने माझ्याशी बोलली नव्हती. ‘तुझं लग्न झालं आहे दोन मुलं आहेत, तू माझ्याशी असं कसं बोलू शकतोस?’ असं ती म्हणाली होती. पण मी माझ्या मनातलं बोललो होतो आणि नशिबाने मला साथ दिली.”

हेही वाचा – ऐश्वर्या राय नव्हे तर ‘ती’ होती विवेक ओबेरॉयचं पहिलं प्रेम, १७ व्या वर्षी झालं निधन; आठवण सांगत म्हणाला, “तिच्या मृत्यूने…”

जोडीदारांशी प्रामाणिक राहायला हवं – बोनी कपूर

बोनी यांनी कालांतराने नाती कशी विकसित होतात, त्याबद्दल सांगितलं. “जाणाऱ्या प्रत्येक वर्षाबरोबर जोडप्यांमधील समज वाढली पाहिजे. कोणतेही मतभेद नसलेले प्रेमळ नाते फार काळ टिकत नाही. कोणीही परफेक्ट नाही. मी परफेक्ट नव्हतो. माझं आधीच लग्न झालं होतं; पण मी कधीच गोष्टी लपवल्या नाहीत. मोना (पहिली पत्नी) शेवटपर्यंत माझी मैत्रीण राहिली. तुमच्या जोडीदारांशी प्रामाणिक राहणं चांगलं असतं, त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मुलांशीही प्रामाणिक असायला हवं. मी माझ्या मुलांचा मित्र आहे, मी माझ्या मुलांची आई आहे, मी माझ्या मुलांचा बाबा आहे,” असं बोनी कपूर म्हणाले.

बोनी कपूर व श्रीदेवी (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा – एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”

सात वर्षांनंतरच लोक खरंच कसे आहेत, ते कळंत असं बोनी कपूर यांनी सांगितलं. “तुम्ही तुमच्या जोडीदारांशी आणि तुमच्या मुलांशी ट्रान्सपरंट असाल तरच नाती यशस्वी होतात. नात्यांमध्ये कोणता खोटेपणा, दिखावा करू नये,” असं बोनी कपूर म्हणाले.

हेही वाचा – एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”

बोनी कपूर यांनी मोना शौरी यांच्याशी १९८३ मध्ये लग्न केलं. दोघांचा १९९६ साली घटस्फोट झाला. बोनी व मोना यांना अर्जुन कपूर व अंशुला कपूर ही दोन अपत्ये आहेत. त्यानंतर बोनी यांनी श्रीदेवीशी दुसरं लग्न केलं. या जोडप्याला जान्हवी व खुशी या दोन मुली आहेत; दोघीही अभिनेत्री आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sridevi did not speak to boney kapoor for six months after he proposed said you are married with two kids hrc