सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणून ‘श्रीदेवी’ यांना ओळखले जाते. श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटांमध्येही काम करायला सुरुवात केली होती. श्रीदेवी आणि बोनी कपूर हे दोघेही कायमच चर्चेत असतात. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांचे बॉन्डींग कमालीचे आहे. पण एका चित्रपटादरम्यान श्रीदेवी या बोनी कपूर यांच्याशी तीन महिने बोलत नव्हत्या.
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचा हा किस्सा ‘मॉम’ या चित्रपटादरम्यानचा आहे. या चित्रपटात श्रीदेवीच्या दमदार अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. ‘मॉम’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर श्रीदेवीने या चित्रपटाबद्दल अनेक खुलासे केले होते. ‘मॉम’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी ३ महिने एकमेकांशी बोलले नव्हते.
आणखी वाचा : श्रीदेवी यांची मुलगी असल्यामुळे जास्त टीका होते का? जान्हवी कपूर म्हणते “हो कारण…”
‘मॉम’ या चित्रपटाचे शूटींग २०१६ मध्ये झाले होते. त्यावेळी श्रीदेवी या बोनी कपूर यांना रोज सकाळी गुड मॉर्निंग आणि रात्री पॅकअपनंतर गुड इव्हनिंग इतकंच बोलायच्या. या चित्रपटाचे शूटींग ३ महिने सुरु होते. त्यावेळी त्यांनी बोनी कपूर यांच्याशी कोणतेही संभाषण केले नव्हते.
त्यावेळी श्रीदेवी म्हणाल्या होत्या की, “मी त्यावेळी एका दिग्दर्शकाची अभिनेत्री होते. माझ्या प्रत्येक चित्रपटादरम्यान स्वत:ला दिग्दर्शकाच्या स्वाधीन करायचे. त्यानुसारच मी त्यावेळी ते केले. मी दिग्दर्शक रवी उदयावर यांचं ऐकायची. त्यांनी सांगितल्यानुसार काम करायचे.”
दरम्यान बोनी कपूर यांचा २०१७ मध्ये ‘मॉम’ चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटात श्रीदेवी एका आईच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात सजल अली, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अक्षय खन्ना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.