आज १३ ऑगस्ट रोजी हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली महिला सुपरस्टार मानल्या जाणाऱ्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुगलने डूडल करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या आजच्या खास दिवशी गुगलने डूडल करून श्रीदेवींचे यश आणि सिनेमातील प्रवास साजरा केला आहे.

दिवंगत श्रीदेवींच्या वाढदिवसानिमित्त गुगलच्या सर्च इंजिनवर श्रीदेवींच्या फोटोंचे डूडल करण्यात आले आहे. फोटोमध्ये त्या डान्स पोजमध्ये दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला इतर सिनेमांची झलक पाहायला मिळते. यासोबतच त्यांच्या ‘नागिन’ या सुपरहिट चित्रपटातील पोजही पाहायला मिळत आहेत.

Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
top 10 search on google in 2024
Google Search: भारतीय गुगलवर गेल्या वर्षभरात काय शोधत होते माहितीये? गुगल सर्च रिपोर्टची माहिती आली समोर!
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा
Aishwarya Narkar Birthday
५० वर्षांच्या झाल्या ऐश्वर्या नारकर! ‘असा’ साजरा केला वाढदिवस; व्हिडीओत दाखवली संपूर्ण झलक, म्हणाल्या…
Sridevi google doodle
श्रीदेवी यांचे गुगल डूडल

श्रीदेवी यांचे पूर्ण नाव श्री अम्मा यंगर अय्यपन होते. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ रोजी तामिळनाडूमधील मीनमपट्टी या छोट्याशा गावात झाला होता. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यांनी ‘कंधन करुणाई’ या तमिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी ‘रानी मेरा नाम’ मधून बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आपल्या मेहनतीमुळे त्यांनी हळूहळू चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केली. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी अमोल पालेकर यांच्याबरोबर ‘सोलहवा सावन’मधून अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

अक्षय कुमारवर थुंकणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस, राष्ट्रीय हिंदू परिषदेची घोषणा; नेमकं प्रकरण काय?

जितेंद्र यांच्याबरोबरचा ‘हिम्मतवाला’ हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यांनी जितेंद्रबरोबर १६ चित्रपटांमध्ये काम केले होते. त्याच्या ‘सदमा’ या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. या चित्रपटासाठी त्यांचं कौतुक झालं आणि त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

‘गदर २’ की ‘ओएमजी २’, कोणत्या चित्रपटाने मारली बॉक्स ऑफिसवर बाजी? वाचा दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे

एकापेक्षा एक सरस चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या श्रीदेवी यांनी १५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर २०१३ साली ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटाद्वारे पुनरागमन केले होते. यानंतर त्या २०१८ मध्ये ‘मॉम’ चित्रपटात दिसल्या. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईमध्ये त्यांचे दुःखद निधन झाले. पती बोनी कपूर यांना त्या हॉटेलच्या खोलीतील बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची नोंद माहिती समोर आली होती.

Story img Loader