Star Kids Bollywood Debut in 2025 : शाहरुख खान, सलमान खान यांसारख्या दिग्गजांचे सिनेमे आजही बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम करून बक्कळ कमाई करतात. हे दिग्गज गेल्या ३० वर्षांपेक्षा जास्त काळापासून बॉलीवूडमध्ये असून त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. हे सर्व स्टार्स आज त्यांच्या पन्नाशीत असून त्यांचे स्टारडम आजही टिकून आहे. या पिढीतील स्टार्सचा बॉलीवूडमध्ये प्रभाव असला तरी बॉलीवूडमध्ये आता नवी पिढी येत आहे. यात शाहरुख आणि सलमानच्या पिढीतील स्टार्सची मुले असणार आहेत.

२०२५ मध्ये, बॉलीवूडमध्ये नव्या पिढीचा प्रभाव दिसू लागणार आहे. आर्यन खान, इब्राहिम खान, राशा थडानी, शनाया कपूर आणि अमन देवगण यासारखी तरुण पिढी मनोरंजन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्याचबरोबर नितांशी गोयल, अभय वर्मा आणि लक्ष लालवानी हे तरुण कलाकार सिनेमाला नवी दिशा देण्यासाठी पुढे येत आहेत.

Budhaditya rajyog in scorpio
‘या’ ३ राशी कमावणार बक्कळ पैसा; मंगळाच्या राशीतील बुधादित्य राजयोग देणार पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Yashasvi Jaiswal & Sam Konstas Fight Later Jaiswal Shot Hit Konstas Very Hard IND vs AUS Video
IND vs AUS: “आपलं काम कर…”, जैस्वाल कॉन्स्टासमध्ये जुंपली; यशस्वीच्या बॅटने दिलेलं उत्तर कॉन्स्टास कधीच विसरणार नाही , VIDEO व्हायरल
baba Vanga Predictions 2025 astrology in marathi
Baba Vangas Predictions 2025 : २०२५ मध्ये ‘या’ पाच राशी होणार अफाट श्रीमंत! नवीन वर्षात प्रचंड धनलाभाची संधी; बाबा वेंगांची भविष्यवाणी
2025 Numerology Predictions Number 9 in Marathi
Number 9 Numerology Predictions: ‘या’ जन्मतारखांवर वर्षभर राहील मंगळाचा प्रभाव! उद्योगधंद्यांत यश, तर ‘या’ गोष्टी टाळणे योग्य; वाचा, उल्हास गुप्तेंची भविष्यवाणी…
Suresh Dhas Statement on Prajkata Mali
Suresh Dhas Vs Prajakta Mali : “प्राजक्ताताई माळींसह मी सर्व स्त्रियांचा आदर करतो, त्यांची मनं दुखावली..”, सुरेश धस यांची अखेर दिलगिरी
Ganesh Naik on Anand Dighe
Ganesh Naik: ‘माझे विरोधक स्वर्गवासी झाले, एकही जिवंत नाही’, भाजपा नेत्याच्या विधानानंतर शिंदे गट आक्रमक
Gashmeer Mahajani calls Bigg Boss 18 third class
“काय ते थर्ड क्लास…”, गश्मीर महाजनीचं Bigg Boss 18 बद्दल प्रश्न विचारणाऱ्याला उत्तर; म्हणाला, “अहो तुम्ही मराठी सिनेमा…”

हेही वाचा…शो रद्द होऊनही ‘बेबी जॉन’ चित्रपटाने गाठला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा, चौथ्या दिवशी कमाईत झाली वाढ

नव्या पिढीचे स्वागत

२०२५ हे वर्ष बॉलीवूडसाठी नव्या सुरुवातीचे संकेत देते आहे. सलमान खान, शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांनी वर्षानुवर्षे सिनेमाचे नेतृत्व केले. रणवीर सिंग, रणबीर कपूर, कार्तिक आर्यन, राजकुमार राव, सिद्धार्थ मल्होत्रा यांसारख्या कलाकारांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. मात्र, आता बॉलीवूडची नवी पिढी नव्या जोमाने आपले स्थान निर्माण करण्यासाठी तयार झाली आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याच्या ‘स्टारडम’ या वेब सीरिजमधून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतोय. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान करण जोहरच्या बॅनरखाली अभिनय क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. रवीना टंडनची मुलगी राशा थडानी १९ वर्षांची असून अजय देवगणचा पुतण्या अमन देवगणबरोबर ‘आजाद’ चित्रपटातून पदार्पण करणार आहे. शनाया कपूर, अहान पांडे यांसारख्या स्टार किड्सचीही बॉलीवूडमध्ये येण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

हेही वाचा…Sikandar Teaser : “सुना है की बहोत सारे…”, सलमान खानच्या बहुचर्चित ‘सिकंदर’चा टीझर प्रदर्शित; सिनेमाची रिलीज डेटही ठरली

नव्या पिढीने पारंपरिक सिनेमाच्या चौकटीच्या बाहेर पडून विविध प्रकारचे प्रयोग करण्याची तयारी दाखवली आहे. आर्यन खानने अभिनय सोडून दिग्दर्शनाची वाट धरली आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खानने यावर्षी (२०२४) मध्ये आलेल्या ‘महाराज’ या सामाजिक आशयाच्या पीरियड सिनेमाची त्याच्या सिनेसृष्टीतील पदार्पणाची निवड केली होती.

Story img Loader