बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या राजेशाही थाटासाठी ओळखला जातो. त्यांचं राजघराणं, त्यांचा इतिहास, त्यांचा ‘पतौडी महाल’ या विषयी प्रत्येकाला कुतूहल आहे. सैफचे वडील टायगर पतौडी यांचे वाड वडील यांच्याबद्दल कित्येकांना कुतूहल असतं. याआधीदेखील सैफने त्याच्या शाही ‘पतौडी पॅलेस’ची झलक आपल्याला दाखवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच ‘मिंत्रा’च्या एका जाहिरातीनिमित्त सैफने पुन्हा प्रेक्षकांना त्यांच्या रॉयल पॅलेसची सफर घडवून आणली आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये राजवाड्याचा परिपूर्ण घुमट त्याच्या मागील भागातले भव्य आणि सुंदर कारंजे वाजते. पॅलेसमधील दोन्ही भिंती जुन्या पेंटिंग्ज, चित्रे, लाकडी वस्तु आणि काचेच्या कॅबिनेटने सजवलेल्या आहेत. शिवाय कित्येक शानदार गुलाबी रंगाचे सोफे आणि इतर भव्य वस्तू पाहताना आपण हरवून जातो. राजवड्यातील प्रत्येक कोपरा सुंदर कलाकृती, फुलदाण्या आणि इतर आकर्षक गोष्टींनि सुशोभित केलेला आहे.

आणखी वाचा : अमिताभ बच्चन आणि अजय देवगण येणार आमने-सामने; ‘दृश्यम २’ ‘उंचाई’वर भारी पडणार का?

मध्यंतरी २०१७ च्या एका मुलाखतीमध्ये सैफ अली खानने त्याच्या राजेशाही थाटाबद्दल आणि राजेशाही घराण्याबद्दल खुलासा केला आहे. राजघराण्यात जन्म घेऊनही सैफची जडणघडण कशी झाली याबद्दल त्याने खुलासा केला. सैफ म्हणाला, “पैशाच्या बाबतीत, माझ्या पालकांनी मला कधीही पॉकेटमनी म्हणून हातखर्चाला पैसे दिले नाहीत. माझे पालनपोषण सामान्य मुलासारखे झाले. मी कधीच नवाब नव्हतो. ते चित्रपटांमध्ये मिळालेलं एक बिरुद आहे. माझे वडील (मंसूर अली खान पतौडी) शेवटचे नवाब होते आणि त्यांनीदेखील स्वतःला कधी नवाब म्हणवून घेतलं नाही.”

सैफ अली खान हा सध्या त्याच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सैफने रावणाची भूमिका साकारली आहे. यातील सैफच्या लूकमुळे सध्या चांगलाच वाद पेटला आहे. सोशल मीडियावर यावर सडकून टीका होत आहे. इतकंच नाही तर चित्रपटाच्या निर्मात्यांनी रावणाचा लूक बदलण्याचंसुद्धा ठरवलं आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट पुढीलवर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे.