Stree 2 movie shooting begins : बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘स्त्री’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यानंतर काही दिवसांनी ‘स्त्री २’ च्या सीक्वेलबाबत घोषणा करण्यात आली. नुकतीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ‘स्त्री २’ केव्हा रिलीज होणार याबाबत श्रद्धा कपूरने माहिती दिली आहे.

हेही वाचा : “१२ वर्षांची मेहनत आणि जिद्द…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे हिंदी मालिकेत पदार्पण, शेअर केली खास पोस्ट

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो

श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावने ‘स्त्री २’ चित्रपटातील एक थरारक व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टवर “पुन्हा एकदा चंदेरी शहरात पसरली स्त्रीची दहशत, ऑगस्ट २०२४ मध्ये ती येणार…”असे कॅप्शन देण्यात आले आहे. तसेच ‘स्त्री २’ च्या शूटिंगला सुरुवात झाली असल्याचेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. एका युजरने अभिनेत्रीने केलेल्या पोस्टवर, “एवढ्या सुंदर अभिनेत्रीला भूत का बनवले? ” असा प्रश्न कमेंटमध्ये विचारला आहे. तर इतर युजर्सनी श्रद्धाला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “२०१९ मध्ये ‘बाईपण भारी देवा’साठी निर्माता मिळत नव्हता”, केदार शिंदेंना आठवले जुने दिवस; म्हणाले, “तेव्हा डोळ्यात पाणी आलं…”

‘स्त्री २’ चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक करणार आहेत. यामध्ये श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि अभिनेते पंकज त्रिपाठी मुख्य भूमिका साकारणार आहेत. राजकुमार आणि श्रद्धा यांनी शेअर केलेली ‘स्त्री २’ चित्रपटाची पहिली थरारक झलक पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : ‘हर हर महादेव’चा जयघोष! अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘OMG 2’ चा दमदार टीझर प्रदर्शित

दरम्यान, २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, क्रिती सेनॉन, विजय राझ, नोरा फतेही, अभिषेक बॅनर्जी अशी तगडी स्टारकास्ट होती. या चित्रपटाचे कथानक, त्यामधील गाणी प्रेक्षकांनी खूपच आवडली होती. तेव्हाच प्रेक्षकांनी ‘स्त्री २’ चित्रपटाची मागणी केली होती. अखेर हा बहुप्रतीक्षित चित्रपट पुढच्या वर्षी ऑगस्टमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader