सिनेइंडस्ट्रीत ‘आउटसायडर’ असूनही आपल्या अप्रतिम अभिनयाने स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे राजकुमार राव (Rajkummar Rao) होय. सध्या ‘स्त्री २’च्या यशामुळे चर्चेत असलेल्या राजकुमारला चित्रपटात काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. राजकुमार रावचा आज ४० वा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने त्याचा संघर्ष, संपत्ती, पहिल्या चित्रपटासाठी मिळालेलं मानधन, कार कलेक्शन याबद्दल जाणून घेऊयात.
एकवेळ अशी होती की राजकुमार रावच्या पालकांकडे शाळेची फी भरण्याचे पैसे नव्हते. त्यावेळी त्याच्या शिक्षकाने फी भरली होती. तो अभिनेता होण्यासाठी मुंबईला आला तेव्हा त्याची राहण्याची सोय नव्हती. सुरुवातीला त्याच्याकडे पैसे नसायचे तेव्हा तो बिस्किट खाऊन दिवस काढायचा. पण या परिस्थितीतही त्याने हार मानली नाही, तो संघर्ष करत राहिला. त्याने पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून अभिनयाचे धडे गिरवले आणि काम मिळवण्यासाठी धडपड सुरू केली.
पहिल्या चित्रपटासाठी राजकुमारला मिळालेले ११ हजार
Rajkummar Rao First Movie: नुकत्याच एका मुलाखतीत राजकुमारने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगितली. त्याला काम मिळत नव्हतं, अनेक मोठ्या चित्रपटांमधून त्याला काढण्यात आलं होतं. ‘लव्ह सेक्स और धोखा’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या राजकुमारला मानधन म्हणून फक्त ११ हजार रुपये मिळाले होते.
सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”
राजकुमार रावचे चित्रपट
Rajkummar Rao Films: राजकुमार रावने ‘काय पो छे’, ‘शाहिद’, ‘अलिगढ’, ‘बधाई दो’, ‘स्त्री’, ओमेट्रा, ‘न्यूटन’, ‘शादी में जरूर आना’, ‘बरेली की बर्फी’, ‘हमारी अधुरी कहानी’, ‘कहानी’, ‘जजमेंटल है क्या’, ‘डॉली की डोली’, ‘राबता’, ‘मिस्टर अँड मिसेस माही’, ‘श्रीकांत’ यासारख्या चित्रपटात काम केलं आहे. सध्या त्याचा ‘स्त्री २’ चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे.
२० सिनेमे फ्लॉप, १३ वर्षे चित्रपटांपासून दूर; बॉलीवूड अभिनेता तरीही कमावतो बक्कळ पैसे, करतो ‘हे’ काम
राजकुमार रावची नेट वर्थ
Rajkummar Rao Net worth: फायनान्शियल एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, राजकुमार राव यांच्याकडे सध्या ८१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत चित्रपट आहेत. तो एका चित्रपटासाठी ५-६ कोटी रुपये घेतो. तसेच तो अनेक ब्रँड्सच्या जाहिराती करतो, त्यासाठी तो एक ते दोन कोटी रुपये मानधन घेतो. रिपोर्ट्सनुसार, त्याने ‘स्त्री २’साठी सहा कोटी रुपये घेतले.
अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ती कोण आहे, काय करते? जाणून घ्या
घराची किंमत व कार कलेक्शन
Rajkummar Rao Home: राजकुमार राव त्याची पत्नी अभिनेत्री पत्रलेखा पॉलसह एका ट्रिपलेक्स अपार्टमेंटमध्ये राहतो. या अपार्टमेंटची किंमत अंदाजे ४४ कोटी रुपये आहे. त्याच्या कार कलेक्शनबद्दल (Rajkummar Rao Car Collection) बोलायचं झाल्यास राजकुमार रावकडे ऑडी क्यू7 (किंमत ८० लाख), मर्सिडीज बेंझ सीएलए २०० (३७.९६ लाख रुपये) आणि मर्सिडीज बेंझ जीएलएस (१.१९ कोटी रुपये) यासह इतर काही लक्झरी गाड्या आहेत. तसेच त्याच्याकडे १८ लाख रुपयांची हार्ले डेविडसन फॅट बॉब बाइक आहे.