Stree 2 Movie Collection : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा ‘स्त्री-२’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. अवघ्या चार दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. बऱ्याचदा असं होतं की, सिनेमाचा पहिला भाग जितका जास्त प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो तेवढा प्रतिसाद दुसऱ्या भागाला मिळत नाही. मात्र स्त्रीच्या दुसऱ्या भागाला देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवघ्या चार दिवसांत तब्बल २०० कोटींची कमाई करत या वर्षात ‘स्त्री-२’ने ( Stree 2 ) बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक केला आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत ‘स्त्री-२’ने इतर सिनेमांना मागे काढलं. ‘कल्की’च्या यशानंतर आता स्त्रीच्या दुसऱ्या भागाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अजय देवगणचा ‘औरों में कहाँ दम था’, ‘लापता लेडीज’, ‘पंचायत’, ‘चंदु चॅम्पियन’, ‘कोटा फॅक्टरी’ यांसारख्या हिट वेब सीरिज आणि सिनेमांच्या यादीत नाव असलेल्या ‘स्त्री- २’ने चाहत्यांच्या मनावर चांगलीच छाप सोडली.

हेही वाचा – अभिनेत्री सोनम खानने सांगितलं दिवंगत दिव्या भारतीबरोबरचं शेवटचं संभाषण; म्हणाली, “ती मला…”

या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा सिनेमा ठरला आहे. सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ५५ कोटी रुपयांची कमाई केली. प्रिव्ह्यूला ८.५ कोटी तर पहिल्याच दिवशी तब्बल ७६.५ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी ५४ कोटी तर पाचव्या दिवशी ५५ कोटी म्हणजेच ४ दिवसांत २२५ कोटींची विक्रमी कमाई ‘स्त्री-२’ने ( Stree 2 ) केली आहे.

Stree 2 Movie ( Photo Credit – Shraddha Kapoor Instagram )

हेही वाचा – Chhaava : विकी कौशलचा रुद्रावतार, शिवगर्जना अन्…; ‘छावा’ चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित!

‘स्त्री’च्या ( Stree 2 ) पहिल्या भागाला देखील प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. हॉरर, सस्पेन्स आणि कॉमेडी सिनेमात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली. तिच उत्कंठा आणि तोच थ्रिल सिनेमाच्या दुसऱ्या भागात देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळेच प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत.

स्त्रीच्या भूमिकेत झळकली जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूरने सिनेमात साकारलेली स्त्रीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. ‘स्त्री-२’मधील ( Stree 2 ) जान्हवीने साकारलेल्या भूमिकेचं कौतुकही केलं जात आहे. ‘धडक’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली जान्हवी ‘मिस्टर अँड मिसेस माही’, ‘गुंजन सक्सेना’ या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकली होती. ‘स्त्री-२’च्या आधी देखील राजकुमार रावबरोबर ‘रूही’ सिनेमातून जान्हवी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. सध्या ‘स्त्री-२’ने केलेल्या विक्रमी कमाईमुळे सिनेमातील कलाकार देखील चर्चेचा विषय ठरत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stree 2 recordbreak hit cinema best collection on boxoffice tsg